मोफत गॅस सिलेंडर मिळणार

शनिवार, 16 मार्च 2024 (11:56 IST)
2016 मध्ये उज्ज्वला योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केली होती.प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत 2023-24 या वर्षासाठी उत्तर प्रदेश सरकारने 2,312 कोटी रुपयांचे बजेट ठरवलं आहे. तसेच राज्यातील 1.75 कोटी गरीब महिलांना दरवर्षी दोन मोफत गॅस सिलिंडर रिफिल या योजनेंतर्गत केले जाणार आहेत. केवळ दहा दिवसांचा अवधी होळी सणाला उरलाय, मोफत गॅस सिलेंडर देण्याची घोषणा या निमित्ताने सरकराकडून करण्यात आली आहे. तसेच उत्तरप्रदेशातील योगी सरकार हे राज्यातील जवळजवळ 1.75 कोटी पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी सिलिंडर देणार आहेत. पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचं वाटप केले जाईल.  वर्षातून दोनवेळा मोठ्या सणांच्या दिवशी योगी सरकारच्या योजनेनुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.दिवाळीच्या दिवशी मोफत एलपीजी सिलेंडरचं वाटप याआधी योगी सरकारने केलं होतं. 
 
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचं बँक खातं आधारशी लिंक मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेण्यासाठी,करावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये ही उज्ज्वला योजना सुरू केली होती. 1 नोव्हेंबर 2023 ते 15 फेब्रुवारी 2024  दरम्यान 80.30 लाख उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना गॅस सिलेंडर रिफिल करुन देण्यात आले. तसेच 1 जानेवारीपासून आतापर्यंत सुरु आहे. यात आतापर्यंत 50.87 लाख महिलांना गॅस सिलेंडर रिफिल करून देण्यात आलेत. आतातापर्यंत एकूण 1.31 कोटी हून अधिक गॅस सिलेंडर योगी सरकारने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आले आहेत. लाभार्थी महिलांच्या खात्यात अनुदानाची रक्कम खात्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 नोव्हेंबर 2023 ला ही योजना सुरु करताना जमा केली. लोकसभा निवडणूकीआधी 8 मार्चला महिला दिनाचं औचित्य साधून गॅस सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची घट केल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता सिलेंडरची किंमत दिल्लीत  803 रुपये आणि कोलकाता 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, चेन्नईत 818.50 रुपये इतकी आहे. पेट्रोल-डिेझेलच्या दरातही सरकारी तेल कंपन्यांनी घट केली आहे राजस्थान सरकारनेदेखील पेट्रोल-डिझेल स्वस्तची घोषणा केली आहे. तसेच देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती