भविष्य निर्वाह निधी आता 'लॉयल्टी-कम-लाइफ’

शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (12:08 IST)

सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे. याशिवाय एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची किमान रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. ईपीएफओच्या संचालक मंडळाने यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या सदस्यांनाही या सुविधेचा लाभ मिळेल. अपंगत्व आलेल्या सदस्याचे योगदान २0 वर्षांपेक्षा कमी कालावधीचे असले तरी ‘लॉयल्टी-कम-लाइफ’चा लाभ त्याला दिला जाईल. 

वेबदुनिया वर वाचा