एक हजारापेक्षा कमी रकमेची खरेदी डेबिट कार्डवरून महागणार

नवीन वर्षात डेबिट कार्डद्वारे केलेली 1 हजारापेक्षा कमी रकमेची खरेदी महाग पडणार आहे. 
 
कार्ड खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने मर्चंट डिस्काउंट रेटची (एमडीआर) नवी पद्धत निश्चित केली आहे. 
 
आतापर्यंत खरेदीच्या रकमेनुसार शुल्क आकारले जात होते. आता ते दुकानदारांकडून प्रति ट्रान्झॅक्शन कमाल 200 रु. मोठ्या दुकानदारांकडून 1 हजारहून जास्त शुल्क घेऊ शकणार नाहीत. 
 
कार्डने पेमेंट केले तर बँका दुकानदारांकडून शुल्क घेतात. यालच एमडीआर असे म्हणतात. दुकानदार हे शुल्क ग्राहकांकडूनच वसूल करतात. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश 1 जानेवारी 2018 पासून लागू होईल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती