कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पेट्रोल-डिझेलची दरवाढ लांबणीवर

बुधवार, 16 मार्च 2022 (10:54 IST)
जागतिक बाजारपेठेत तीन आठवड्यांत पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या - ब्रेंट क्रूडच्या किंमती खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती बॅरलमागे 97.44 डॉलरवर आलेल्या आहेत. यामुळे भारतातली इंधन दरवाढ काहीशी पुढे जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलंय.
 
7 मार्चला क्रूड तेलाचे दर बॅरलासाठी 137 डॉलर्सपर्यंत गेले होते. यामुळेच पेट्रोल - डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर आपण महागाईची झळ रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.
 
चीनमध्ये पुन्हा डोकं वर काढलेला कोरोना व्हायरस, रशिया - युक्रेनमधली युद्ध थांबवण्यासाठीची बोलणी याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींवर झाला आणि ट्रेडिंगदरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती