विदर्भ, मराठवाडय़ातील कापूस उत्पादक क्षेत्राला पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा फटका बसला आहे. कापूस क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव झाला असून बोंडअळीमुळे या वर्षी कापूस उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली.
सिंचनाची सुविधा असलेल्या भागात बाधित कपाशी उपटून रब्बी हंगामील पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, राज्य शासनाने मदत करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.