भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने एकदा परत आपल्या लोकप्रिय प्री-पेड प्लानला अपडेट केले आहे. BSNLच्या या प्लानची किंमत 1,098 रुपये आहे. सांगायचे म्हणजे की BSNL चा हा प्लान 2016मध्ये जिओच्या लाँचिंगच्या वेळेस सादर करण्यात आला होता आणि हा बीएसएनएलचा पहिला प्री-पेड प्लान होता ज्यात 84 दिवसांची वैधता मिळत होती. BSNL चा हा प्लान जिओच्या 84 दिवसांच्या प्लानला टक्कर देण्यासाठी सादर करण्यात आला होता.
BSNL चे 1,098 रुपयाच्या प्लानचे फायदे
बीएसएनएलच्या या प्लानची महत्वाची गोष्ट म्हणजे यात पूर्णपणे अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अशात रोज आउटगोइंग कॉलिंगची कुठलीही सीमा नाही आहे, पण कंपनीने या प्लानची वैधता जरूर कमी केली आहे. आधी या प्लानमध्ये 84 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मेसेजिंग मिळत होते पण आता याची वैधता 75 दिवसांची केली आहे. BSNL च्या या प्लानमध्ये आता ऐकून 375 जीबी डाटा मिळेल. अशात हे तुमच्यावर निर्भर करत की तुम्ही या डेटाला 75 दिवसांपर्यंत वापर करता की एकाच दिवसाच संपवता.
BSNL ने समाप्त केली 'अनलिमिटेड कॉलिंग'
महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांअगोदर BSNL ने अनलिमिटेड कॉलिंग संपुष्टात आणली आहे. BSNLच्या या निर्णयानंतर कंपनीचे ग्राहक आता एका दिवसात फक्त 250 मिनिटच कॉलिंग करू शकतील, यानंतर कॉलिंग केल्याने शुल्क लागेल. अशात निजी कंपन्यांप्रमाणेच BSNL ने देखील 'पूर्णपणे अनलिमिटेड कॉलिंग' वर रोख लावली आहे, पण हे नियम काही प्लान्सवरच लागू होणार आहे.
BSNL च्या या पाच प्री-पेड प्लानमध्ये नाही मिळणार अनलिमिटेड कॉलिंग
BSNL ने ज्या प्लानसोबत अनलिमिटेड कॉलिंग संपुष्टात आणली आहे त्यात 186 रुपये, 429 रुपये, 485 रुपये, 666 रुपये आणि 1,699 रुपयांचे प्री-पेड प्लान सामील आहे. नवीन नियमानुसार या प्लानचे ग्राहक एका दिवसात 250 मिनिटांपेक्षा जास्त कॉलिंग करू शकणार नाही. या कॉलिंगमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग सामील आहे. 250 मिनिट संपल्यानंतर ग्राहकांकडून 1 पैसे प्रति सेकंदाच्या दराने चार्ज करण्यात येईल.