काळया पैशांसाठी आतापर्यंत 38 हजार ईमेल आले

सोमवार, 17 एप्रिल 2017 (12:21 IST)
कुणाला काळया पैशासंदर्भात माहिती द्यायची असल्यास त्यांना सहजतेने सरकारपर्यंत पोहोचता यावे यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने डिसेंबर महिन्यात विशेष ईमेल आयडीची सेवा सुरु केली होती. सरकारला या ईमेल आयडीवर काळया पैशासंदर्भात आतापर्यंत 38 हजार ईमेल मिळाले असून, त्यातील 16 टक्के ईमेलच पुढे चौकशीसाठी पाठवण्यात आले अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसकडून देण्यात आली.  माहिती अधिकार कार्यकर्ते जीतेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीबीडीटीने ही माहिती दिली. डिसेंबर महिन्यात सुरु केलेल्या [email protected] कितपत प्रतिसाद मिळाला अशी त्यांनी विचारणा केली होती. 38,068 ईमेल मिळाले त्यातील 6050 म्हणजे 16 टक्के ईमेल पुढे चौकशीसाठी पाठवण्यात आले अशी माहिती सीबीडीटीने दिली. 

वेबदुनिया वर वाचा