मोठी बातमी ! एटीएममध्ये पैसे संपले तर आरबीआय बँकेवर दंड आकारेल

बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (13:43 IST)
आपण एटीएममधून पैसे काढायला गेलात आणि पैसे मिळाले नाहीत तर प्रचंड गैरसोय होते.आणि राग देखील येतो.आता आरबीआयने लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी एक योग्य पाऊल उचलले आहे.आपण पैसे काढायला गेल्यावर पैसे मिळाले नाही तर एटीएमशी संबंधित बँकेवर दंड आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे.लोकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये पैसे संपले असल्यास,आता आरबीआय संबंधित बँकेवर 10 हजार रुपयांचा दंड आकारेल आणि हा दंड संबंधित बँकांना 10 तासांपेक्षा जास्त काळ रोख नसल्याबद्दल लावला जाईल. या निर्णयानंतर ग्राहकांना एटीएममधून पैसे सहज मिळू शकतील.
 
आरबीआयने एका परिपत्रकात म्हटले आहे की, एटीएममध्ये रोख रक्कम न पाठवल्याबद्दल दंड आकारण्याचा हेतू लोकांच्या सोयीसाठी या मशीनमध्ये पुरेसा निधी उपलब्ध आहे याची खात्री करणे आहे. जून 2021 च्या अखेरीस देशभरात विविध बँकांचे 2,13,766 एटीएम होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती