CNG- PNG दरात पुन्हा मोठी उसळी, जाणून घ्या गॅसचे नवीन दर

शनिवार, 18 डिसेंबर 2021 (12:14 IST)
सीएनजी आणि पीएनजी गॅसचे दर पुन्हा वधारले आहेत. मुंबईत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) च्या किमती 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून प्रति किलो 2 रुपये आणि 1.50 रुपये प्रति मानक क्युबिक मीटरने वाढतील. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना नक्कीच बसणार आहे. या दरवाढीमुळे सीएनजीचा दर आता प्रतिकिलो 63.50 रुपये झाला आहे, तर पाईप गॅसचा दर आता 38 रुपये प्रति युनिट झाला आहे.
गेल्या तीन महिन्यांत सीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची ही चौथी वेळ आहे. याशिवाय, यंदा मुंबई महानगर क्षेत्रात 11 महिन्यांत सीएनजीच्या दरात सुमारे 16 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे 8 लाखांहून अधिक ग्राहकांवर मोठा फटका पडला आहे. यामध्ये ऑटो-रिक्षा, टॅक्सी आणि बस यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यतिरिक्त 3 लाखांहून अधिक खाजगी कार मालकांचा समावेश आहे.
सीएनजीच्या किमती वाढल्यानंतर काळी -पिवळी टॅक्सी आणि ऑटोरिक्षा युनियनने  आता किमान भाड्यात अनुक्रमे 5 आणि 2 रुपये वाढ करण्याची मागणी करत आहेत.  सणासुदीच्या आधी ऑक्टोबरमध्ये सीएनजी-पीएनजीच्या दरात दोनदा वाढ केली होती.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती