भारत बायोटेकने बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या

गुरूवार, 9 मार्च 2017 (10:46 IST)
भारत बायोटेक या व्हॅक्‍सिन (लस) बनविणाऱ्या कंपनीने सुरक्षा उपाय म्हणून बाजारातून लशीच्या 40,000 बाटल्या परत मागवल्या आहेत. मात्र या व्हॅक्‍सिनच्या बाटल्या परत मागविण्याचे कारण दर्जातील दोष नाही, तर त्यांच्या बॉक्‍सवरील मुद्रणदोष असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार परत मागविण्यात्‌ आलेली व्हॅक्‍सिन्स ही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॅक्‍सिन्स बॅचेसचे कॉंबोपॅक (कॉमव्हॅक 3 प्लस बायोहिब) आहे. तपासानंतर कंपनीने केंद्रीय आणि राज्य औषध अधिकारी, विपणन एजंट्‌स, लस प्रशासक आणि डॉक्‍टर्सना त्याबाबत माहिती दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा