बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) खातेधारकांना काही नियमांमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता खातेधारकांना चेकबुक आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे अशी सुविधा पुरविताना बँक कोणतीही अट ठेवू शकणार नाही. म्हणजेच झिरो बॅलन्सवाल्या खातेधारकांनाही या सुविधा उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत.
बेसिक सेव्हिंग बँक अकाऊंट (बीएसबीडी) हे झिरो बॅलन्समध्ये उघडता येते. इतकेच नव्हे तर या खात्यामध्ये ठरावीक अशी रक्कम भरावी अशी कोणतीही अट किंवा बंधन नाही. प्राथमिक बचत खात्याच्या स्वरूपात बीएसबीडी हे खाते उघडले जाते. यात झिरो बॅलन्सपासून खाते उघडता येते. तत्पूर्वी नियमित व्यवहार सुरळीत असलेल्या बचत खात्यांनाच अशी सुविधा मिळत होती, परंतु आता झिरो बॅलन्सवाल्या खात्यांनाही अशी सुविधा प्राप्त होणार आहे.