बजाज इलेक्ट्रिकल्स निर्लेपचे 80 टक्के शेअर्स 42.50 कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याचं कळतं. मात्र अद्याप कोणतीही रक्कम ठरली नसल्याचं निर्लेपचे सर्वेसर्वा राम भोगले यांनी सांगितलं. व्यवहारानुसार, निर्लेप 80 टक्के शेअर्स बजाज इलेक्ट्रिकल्सला विकणार असून 20 टक्के शेअर्स स्वत:कडे ठेवणार आहे. येत्या सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन हा व्यवहार पूर्ण होईल. निर्लेप उद्योग समुहाचे शेअर मार्केटमधील शेअर्स सतत कोसळत आहेत. त्यामुळे तोटा वाढत असल्याने तसंच जागतिक बाजाराशी स्पर्धा करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं राम भोगले यांनी सांगितलं.