Triumph आणि बजाज ऑटो सोबत पार्टनरशिप

बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:39 IST)
बजाज ऑटोने UK ची बाईक कंपनी Triumph सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या पार्टनरशिपच्या माध्यमातून आम्ही भारतीय आणि ग्लोबल मार्केटमध्ये मिड कॅपॅसिटीच्या बाईक तयार करणार असल्याचे कंपनीने सांगितले.
 
तर बजाज कंपनीकडून आम्ही एकत्र मिळून टेक्नॉलॉजी, डिझाईन आणि आयडिया घेऊन येऊ. सोबतच आम्ही किंमतीच्या बाबतीतची बाजारात जोरदार टक्कर देण्याची आशा करीत आहोत, असे सांगण्यात आले.
या पार्टनरशिपमुळे Triumph ग्लोबल मार्केटसाठी हायर व्हॉल्युम सेगमेंटसाठी बाईक बनवतील. आणि बजाज ऑटो Triumph सोबत मिळून डोमेस्टीक मार्केट व्यतिरीक्त आणखीही काही देशांमध्ये प्रिमियम रेंजच्या बाईक बनवतील. टू-व्हिलर तयार करणारी बजाज ही देशातील चौथ्या क्रमांकाची कंपनी आहे. जी बजेटमध्ये बाईकची निर्मिती करते. सध्या बजाज 400cc-800cc  इंजिनच्या बाईक विकते. मात्र आता 400cc-800cc कंपनीसोबत पार्टनरशिप झाल्याने कंपनीकडून कोणत्या नवीन बाईक बाजारात येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

वेबदुनिया वर वाचा