पतंजलीच्या बिस्किट पॅकेट्सचे वजन कमी, 2.60 लाखाचा दंड

इंदूर- बाबा रामदेव यांची कंपनी पतंजलीचे बिस्किट पॅकेट्सचे वजन कमी निघाल्यावर पतंजलीसाठी बिस्किट तयार करणारी निर्माता कंपनी आणि प्रॉडक्ट्स विकणारे दुकानदाराविरुद्ध 2 लाख 60 हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
हे प्रकरण मध्यप्रदेशातील इंदूर येथील आनंद बाजार स्थित पतंजली चिकित्सालयाहून एका उपभोक्ता कुलदीप पवार ने बिस्किटाचे पॅकेट्स खरेदी केले होते. यात दोन नारळ बिस्किटाचे होते. 100-100 ग्रामच्या पॅकेट्सचे वजन कमी वाटले म्हणून त्यांनी ते चेक करवले. मापन विभागाला तक्रार नोंदवण्यात आली तेव्हा पहिल्या पॅकेटचे वजन 92.92 ग्राम तर दुसर्‍या पॅकेटचे वजन 86.59 ग्राम निघाले.
 
मापन विभागाने कंपनीला नोटिस जाहीर केले. उत्तर मिळाले नाही तर विक्रेताने पतंजली चिकित्सालय आणि निर्माता कंपनीवर केस लावला. तेव्हा कंपनीचे लोकं स्वत: आले आणि आपली चूक स्वीकार केली.
 
विभागाने कंपनीवर 50 हजार रुपये, त्याच्या चार डायरेक्टर्सवर 50-50 हजार रुपये आणि विक्रेतावर 10 हजार रुपये दंड आकारला. एकूण 2 लाख 60 हजार रुपये दंड सरकारी खात्यात जमा करवण्यात आला.
 
पतंजलीसाठी हे बिस्किट हुगलीची सोना बिस्किट लिमिटेड तयार करते आणि पतंजली याची मार्केटिंग करते. सोना बिस्किट्सने पॅकेज संबंधी चुकीची जबाबदारी स्वत:वर घेतली.

वेबदुनिया वर वाचा