त्यानुसार एटीएम वापराचे नियम बदलतील, असं RBI ने सांगितलं आहे. एटीएम मशिनमधून पैसे बाहेर पडण्याची जी प्रणाली आहे ती अधिक सक्षम बनवावी, या मशिनमध्ये वापरण्यात येणारे अॅप्लिकेशन अर्थात सॉफ्टवेअरमध्येही बदल करावेत. त्यावर सातत्याने निगराणी राखावी. महत्वाच्या डेटा सुरक्षित ठिकाणी असावा, त्यावरील प्रक्रिया आणि त्याचे हस्तांतर व्यवस्थित व्हावे असे काही मार्गदर्शक तत्वे बँकेने तयार केली आहेत.