आता एटीएम आणि डेबिट कार्डच्या व्यवहारांवर शुल्क

मंगळवार, 3 जानेवारी 2017 (17:04 IST)
आता एटीएम आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे. नोटाबंदीनंतर सरकारकडून एटीएम आणि डेबिट कार्डवर शुल्क आकारले जात नव्हते. मात्र नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलनकल्लोळ संपण्याआधीच सरकारने एटीएम आणि डेबिट कार्डवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.प्रत्येक बँकेकडून दर महिन्याला एका एटीएम कार्डद्वारे पाचवेळा एटीएममधून पैसे काढता येतात. या पाच व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र पाचवेळा एटीएममधून पैसे काढल्यानंतर पुढील व्यवहारांसाठी प्रत्येक बँकेकडून शुल्क आकारले जाते. नोटाबंदीच्या आधी स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआयकडून एटीएम कार्डद्वारे करण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये आकारण्यात येत होते. तर इतर बँकांकडून प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये आकारले जातात. 
 

वेबदुनिया वर वाचा