आता भारतातही डिजीटल आणि पेपरलेस बँक

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (13:37 IST)
भारतामध्ये पहिली डिजीटल आणि पेपरलेस बँक सुरू झाली आहे. एअरटेल या मोबाईल कंपनीने अर्थात भारती एअरटेलने याची सुरुवात केली असून सध्या राजस्थानमध्ये प्रायोगिक तत्वावर ही बँक सुरू  आहे. या ठिकाणी ग्राहकांना एअरटेलच्या गॅलरीतून रोख रक्कम काढण्याची मुभाही देण्यात आली आहे. याशिवाय मोबाईल फोनच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेण्यात येणार आहे. या बँकेतील बचत खात्यातील रकमेवर ७.२५ टक्के व्याज दर आहे. 

वेबदुनिया वर वाचा