डाळी, मटण आणि मसाले महागल्याने सात नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात खाद्यपदार्थांचा सरासरी महागाई दर गतवर्षाच्या तुलनेत १४.५५ टक्क्यांनी वधारला आहे. थोडक्यात सर्वसामान्यांसाठी महगाई आकाशाला भिडली आहे.
प्राथमिक खाद्यपदार्थांच्या घाऊक मुल्य निर्देशांकावर आधारीत चलन फुगवटा दर सात नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात ५५ टक्के होता. गेल्या वर्षी हा दर १३.६८ टक्के होता.
उडिदच्या किमतीत नऊ टक्के, मटण व मूगात चार, मसाले, जव, गहू व बाजरीच्या किमतीत तीन टक्के वाढ झाली आहे.