जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली असून, आता याचा फटका देहविक्री करणाऱ्या वेश्यांनाही बसला असून, त्यांनीही आपल्या कॉस्ट कटिंगला सुरुवात करत आपले भाव कमी केले आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी खास योजनांची घोषणांनीही या महिलांनी केली आहे.
युरोपात वेश्यांचा अब्जावधी रुपयांचा व्यवसाय आहे. अनेक देशांमध्ये तर याला कायद्याने मंजुरी मिळाली असून, मंदीत या महिलांनी आपले दर कमी करत ग्राहकांना काही डिस्काउंटही देऊ केले आहेत.