नववर्षापासून गॅस सबसिडी खात्यात

मंगळवार, 16 डिसेंबर 2014 (12:59 IST)
नवीन वर्षांपासून घरगुती गॅस सिलिंडरसाठी सबसिडीची रक्कम थेट गॅस ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत नुकताच आढावा घेतला. सबसिडीची रक्कम थेट गॅस ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याचा निर्णयाला कोर्टाच्या आदेशानंतर जून २०१३मध्ये  स्थगिती देण्यात आली होती. आता कोर्टाच्या आदेशानुसार नव्याने बदल करून आधार कार्डशिवायच ही रक्कम खात्यात जमा करण्यात येणार असून १ जानेवारी २०१५ पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा