आयटी उद्योगांवर दहशतवादी सावट

नई दुनिया

गुरूवार, 10 डिसेंबर 2009 (12:03 IST)
देशातील सॉफ्टवेअर उद्योग दहशतवाद्यांच्या यादीत सर्वात वर असून, आयटी उद्योगांनी आपली सुरक्षा वाढवावी असे आवाहन केंद्रीय गृह सचिव जी के पिल्लई यांनी केले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था आणि दहशतवाद या विषयावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. देशातील आयटी उद्योग सध्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा पाया मानले जातात. भारताची आर्थिक ताकद कमी करण्याचा दहशतवादी प्रयत्न करत असून, आयटी उद्योग हे त्यांचे महत्त्वाचे टार्गेट असल्याचे पिल्लई म्हणाले.

मागील काही दिवसांपासून भारतीय आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर सॉफ्टवेअर निर्यात केले असून,आगामी काळात या व्यवसायात 16 टक्क्यांची वाढ होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात असल्याचे पिल्लई यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा