मृत्यूदोषापासून वाचण्यासाठी कुत्र्याशी लग्न

छत्तीसगड येथील कोरबा- बाल्को मार्गावर स्थित बेलगिरीमध्ये संथाल आदिवासी लोकांची एक वस्ती आहे, जिथे मकर संक्रांतीच्या दिवशी एक विचित्र परंपरेचा निर्वाह होतो. येथे आपल्या मुलांना मृत्यूदोषापासून दूर करण्यासाठी त्यांचे कुत्र्याशी विवाह केले जाते.
 
येथे मुलांच्या वरील बाजूपासून दात यायला सुरुवात झाली तर पालकांना मृत्यूदोषाची काळजी वाटायला लागते. या दोषापासून मुक्त होण्यासाठी कुत्र्याशी लग्न लावण्यात येतं. शिशू रोग तज्ज्ञांप्रमाणे वरील बाजूला आधी दात येणे ही साधारण प्रक्रिया असून आदिवास्यांमध्ये याबाबद केवळ अंधश्रद्धा आहे.
 
येथे पाच वर्षापर्यंतच्या मुलांची लग्न करवण्यात येतात. दोष मुलामध्ये असल्यास कुत्री तर मुलीमध्ये असल्यास तिचा विवाह कुत्र्यासोबत लावण्यात येतं. हे लग्न अगदी धूमधडाक्याने करण्यात येत असून पालकांचे म्हणणे आहे की याने त्यांच्यावरील संकट दूर होतं.
 
लग्नानंतर समाजातील लोकांना मेजवानी देण्यात येते. संक्रांतीच्या जवळपास लग्न लावणे शक्य नसल्यास होळीच्या दुसर्‍या दिवशी ही परंपरा निभावली जाते.
 
ही परंपरा पाळणारे संथाल आदिवासी कोरबाच्या बाल्को क्षेत्रात लालघाट, बेलगिरी वस्ती, शिवनगर, प्रगतीनगर लेबर कॉलोनी आणि दीपिकाजवळ कृष्णानगर क्षेत्रात निवास करतात.
 

वेबदुनिया वर वाचा