मद्यपान करणारी कालभैरवाची मूर्ती

ShrutiWD
मूर्ती मद्यपान करू शकते, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसेल? तुम्ही म्हणाल काय राव? चेष्टा करताय की काय? देव आणि मद्य यांचा काही संबंध तरी आहे का? पण उज्जैनच्या काल भैरव मंदिरातील मूर्तीला चक्क मद्य चढविले जाते. विशेष म्हणजे भाविकांनी मोठ्या प्रेमाने चढविलेले हे मद्य कालभैरवाची मूर्ती चक्क ग्रहणही करते.

फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या ठिकाणी नेमके काय घडते याचा शोध घेण्यासाठी उज्जैनला गेले. मंदिरांची नगरी असलेल्या उज्जैनपासून पाच किलोमीटरवर कालभैरवाचे मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली कुठल्याही देवळाच्या परिसरात असतात तशी फूल, प्रसाद, नारळाची दुकाने होती. पण वैशिष्ट्य म्हणजे या सामानाबरोबरच तेथे मद्याच्या छोट्या बाटल्याही दिसल्या. देशी मद्याच्या या बाटल्याना येथे वाइन म्हणतात. विशेष म्हणजे भक्त प्रसादाबरोबरच वाइन खरेदी करताना दिसले.
ShrutiWD

यासंदर्भात रवी वर्मा या दुकानदाराला बोलते केल्यानंतर त्यांनी मनोरंजक माहिती दिली. त्यांनी सांगितले, की बाबाच्या चरणी आलेला प्रत्येक भक्त त्याला मद्य वाहतो. बाबाच्या तोंडाला मद्य लावताच बाटली हळू हळू रिकामी व्हायला लागते.

ही माहिती घेऊन मंदिरात प्रवेश केला. तिथे भाविकांची ही गर्दी उसळलेली. प्रत्येक भाविकाच्या हातात प्रसादाची टोपली. त्यात प्रसादाच्या साहित्याबरोबर मद्याची छोटी बाटलीही दिसली. बाबा नेमके मद्यपान करतात तरी कसे हे पाहण्याची उत्सुकता मग दाटून आली. त्यासाठी एका कोपर्यात उभे राहिले.

उज्जैनमधील कालभैरवाजी मूर्ती मद्यपान करते हे म्हणजे.. यावर आपले मत नोंदवा

ShrutiWD
आतले दृश्य चक्रावून टाकणारे होते. भैरवबाबाच्या मूर्तीजवळ बसलेले गोपाळ महाराज काही मंत्र पुटपुटत होते. एवढ्यात एका भक्ताने प्रसाद आणि मद्य पायाशी ठेवले. गोपाळ महाराजांनी मद्य एका ताटलीत ओतले आणि ताटली कालभैरवाच्या मूर्तीच्या तोंडाला लावली आणि काय आश्चर्य.... काही क्षणात ताटली रिकामी.

भाविक येत होते, तसा हा सिलसिलाही सुरूच होता. प्रत्येक भाविकाचे मद्य मूर्ती सेवन करत होती. हे सगळे डोळ्यासमोरच होत होते. बराच वेळ उभे राहूनही यापेक्षा काही वेगळे दृश्य दिसले नाही. प्रत्येक वेळी मद्य चढविल्यानंतर ताटली रिकामी होत होती.

यासंदर्भात भाविकांना काय वाटते, याची उत्सुकता वाटली. म्हणून एकाशी बोलले. राजेश चतुर्वेदी नावाचा हा भाविक उज्जैनहून आला होता. दर रविवारी तो या मंदिरात येत असतो. तो म्हणाला, सुरवातीला मलाही उत्सुकता होती, शेवटी मद्य जाते कुठे. पण एवढ्या दिवसांनंतर आता माझा विश्वास बसलाय. मद्य स्वतः कालभैरव भगवान पितात.
ShrutiWD

कालभैरवाचे हे मंदिर सहा हजार वर्षे जुने असल्याचे म्हणतात. हे तांत्रिकांचे मंदिर आहे. येथे मास, मद्य, बळी अशा प्रकारे प्रसाद चढविला जातो. पूर्वी तर म्हणे येथे फक्त तांत्रिकांना येऊ देत. ते येथे येऊन तांत्रिक विधी करीत. काही विशिष्ठ वेळी कालभैरवाला मद्याचा प्रसाद ठेवला जात असे. नंतर हे मंदिर इतर लोकांसाठीही खुले करण्यात आले. पण कालभैरवाने मद्य स्वीकारणे सुरूच ठेवले.

येथे येणारा प्रत्येक भाविक देवाला मद्य अर्पण करतो. मंदिराचे पुजारी गोपाळ महाराज म्हणतात, विशिष्ट मंत्र म्हणून कालभैरवाला मद्य चढविले जाते. त्याचा ते अकदी आनंदात स्वीकार करून भाविकांची इच्छा पूर्ण करतात.

ShrutiWD

या मागे रहस्य तरी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मंदिराची अनेक वर्षांपासून सेवा करणार्या राजूल महाराजांना बोलते केले. ते म्हणाले, की त्यांच्या आजोबांच्या काळात एका इंग्रज अधिकार्याने यासंदर्भात खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हाती काहीही लागले नाही. त्याने मूर्तीच्या आजूबाजूला खोदकामही केले. पण तरीही काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर तो अधिकारीच कालभैरवाचा भक्त बनला. त्यानंतरच येथे देशी मद्याला वाईन असे संबोधण्यात येऊ लागले. ही प्रथा आजही सुरूच आहे.

या रहस्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. पण तरीही हाती काही लागले नाही. अनेक लोकांशी बोलले. जाणकारांशी चर्चा केली. पण रहस्य अखेर रहस्यच राहिले. शेवटी एक निष्कर्ष काढला. जिथे श्रद्धा असते तेथे संशय घ्यायला जागा उरत नाही.

मद्यपानाची परंपरा
कालभैरवाला मद्यपान करण्याचा सिलसिला अनेक शतकांपासून सुरू आहे. तो कधी आणि कसा सुरू झाला याविषयी कोणाला काहीही माहिती नाही. येथे असलेल्या लोकांना आणि पंडितांना विचारले, तर ते त्यांच्या लहानपणापासून हे पहात आलेले आहेत, असे सांगतात. त्यांच्या घरातील वयोवृद्धांना विचारले, तर ते त्यांच्या वडील, आजोबांचा हवाला देऊन सांगतात, की कालभैरवाचे मंदिर तांत्रिकांचे होते. तेथे बळी दिल्यानंतर मांस खाण्याबरोबरच कालभैरवाला मद्य चढविण्याची प्रथा होती. आता बळीप्रथा तर बंद पडली. पण मद्य

वाचा नवीन कथा प्रत्येक मंगळवारी....

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा