काळी मिरीचे टोटके

ज्योतिष्याप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम मानली जाणारी काळी मिरी आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर करू शकते. याचे काही प्रयोग केल्याने संकटातून मुक्ती मिळेल. धन, वैभवाची प्राप्ती होईल. पाहू याचे काही सोपे टोटके:
घरातून बाहेर पडताना: आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी प्रमुख दारावर काळी मिरी ठेवा आणि त्यावर पाय ठेवून पुढला पाऊल टाका. ज्या कामासाठी जात असाल त्यात यश मिळेल.
 
पण एकदा यावरून पाय ठेवून बाहेर पडल्यावर काही वस्तू बरोबर घेयची विसरला असला तरी पुन्हा घरात प्रवेश करू नका. असे केल्याने परिणामावर प्रभाव पडू शकतो.
  
पुढील पानावर दुसरा उपाय...

श्रीमंत होण्यासाठी: श्रीमंत व्हायची इच्छा असेल तर मिर्‍यांचे 5 दाणे आपल्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून घ्या. नंतर एखाद्या एकांत चौरस्त्यावर किंवा एकांत जागेवर उभे राहून 4 दाणे चारी दिशांकडे फेकून द्या. नंतर पाचवा दाणा वरती आकाशाकडे फेका. तेथून परत येताना मागे वळून बघू नका. या उपायाने अचानक धन प्राप्तीचे योग बनतात.
 
पुढील पानावर तिसरा उपाय...

शनीची पीडा दूर करण्यासाठी: काळ्या कापडात काली मिरी आणि पैसे बांधून दान करावे. या उपायाने शनीच्या अडीचकी अर्थात ढैयात येत असलेल्या समस्या दूर होतील.
 
पुढील पानावर चौथा उपाय...

शत्रू नाशक: दिवाळीच्या दिवशी काळी मिरीचे दाणे ‘ऊं क्लीं’ बीज मंत्राचा जप करत कुटुंबाच्या सदस्यांवर ओवाळून घरातून बाहेर दक्षिण दिशेकडे फेकून द्या, शत्रू शांत होतील.
 
पुढील पानावर पाचवा उपाय...

काळी मिरी आहारात सामील करा: आपल्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास, शनीची साडेसाती किंवा ढैया असल्यास, शनीच्या प्रभावामुळे रोग असल्यास हा उपाय करा. जेवणात काळं मीठ आणि मिरपूडचा अधिक वापर करा. अन्नात वरून तिखट, मीठ घेणे टाळा. हिरव्या मिरच्यांचेही अधिक सेवन टाळा. या उपायाने रोग आणि दुःख दूर होतील.

वेबदुनिया वर वाचा