काळी मान स्वच्छ करण्यासाठी 3 सोपे उपाय

मान काळी असली तर चेहरा कितीही गोरा आणि आकर्षक असो, सुंदरता फिकी पडते. काही लोकं रोज अंघोळ करताना खूप मान घासतात तरी काही परिणाम हाती लागत नसून मान लाल होऊन जाते. आज आम्ही आपल्याला सांगू असे काही सोपे उपाय ज्याच्या मदतीने आपण काळी मान स्वच्छ करू शकतात. या वस्तू आपल्या सहजपणे घरात उपलब्ध होऊन जातील.. पहा हे सोपे 3 उपाय:
बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसाने त्वचेचा रंग हलका होतो. कच्चा बटाटा किसून मानेवर लावावा. किंवा किसलेल्या बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून मानेवर लावा आणि 20 मिनिटाने गार पाण्याने धुवावा.

बेकिंग सोडा
बेकिंग सोडा मानेवरील काळी परत हटविण्यास प्रभावी ठरेल. आपल्याला 1 चमचा पाण्यासोबत 2 चमचे बेकिंग सोडा मिसळून आपल्या मानेवर लावायचे आहे. नंतर हे वाळल्यावर पाण्याने धुऊन टाका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा अमलात आणा.

कोरफड
कोरफड त्वचेला उत्तम रिझल्ट देतं. कोरफडीचा रस मानेवर लावून अर्धा तास राहू द्या. नंतर पाण्याने मान धुऊन टाका. हे क्रम रोज करा आपल्या उत्तम परिणाम हाती लागतील.

वेबदुनिया वर वाचा