* त्वचेच्या प्रकारानुसार फेस मास्कची निवड करायला हवी. फेस मास्क लावताना आपण त्वचेकडे लक्षच देत नाही आणि तिथेच सगळी गडबड होते. कोरड्या त्वचेसाठी ओलावा देणारा म्हणजेच हायड्रेटिंग फेस मास्क हवा. तेलकट त्वचेसाठी मेटिफाय क्ले मास्क अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे फेस मास्क लावण्याआधी आपल्या त्वचेचा पोत जाणून घ्या.
* मास्क लावण्याआधी चेहरा आणि हात स्वच्छ धुवून घ्या. अस्वच्छ हातांनी फेस मास्क लावल्यास धुलीकण, जंतू चेहर्याकवर बसतात. यामुळे चेहर्याावर मुरूमं, पुटकुळ्या येऊ शकतात.
* चेहर्यारवरील मास्क वाळल्यानंतर लगेच धुवून टाका. मास्क बराच काळपर्यंत ठेवल्यास त्वचा कोरडी पडून खेचल्यासारखी वाटते. मास्क जास्त काळ ठेवल्याने अधिक लाभ होतात हा एक गैरसमज आहे. यासोबतच फेस मास्कची पॅच टेस्ट करून बघा. त्वचा लाल होणे, मुरूमं येणे अशा समस्या उद्भवल्या नाहीत तर पुढे जा.