चेहर्यावर आलेला मस किंवा चामखीळ हा सौंदर्याला बाधक असतो. खरेतर मस किंवा चामखीळ शरीरावरील कोणत्याही भागावर येऊ शकतो. पण चेहर्यावर एकापेक्षा अधिक मस असणे त्रासदायक वाटते कारण त्यामुळे चेहरा चांगला दिसत नाही. हे मस किंवा चामखीळ घालवण्यासाठी शेकडो उपाय करून पाहिले जातात. पण जर तुम्ही मस किंवा चामखीळमुळे त्रासलेले असाल तर काही घरगुती उपायांनी मस किंवा चामखीळपासून कायमची सुटका मिळवता येईल.