उन्हाळ्यात त्वचेला अनेक प्रकारच्या समस्या येतात. उन्हात निघाल्यामुळे त्वचा काळी पडते व खराब होते. टॅनिग झाल्यामुळे त्वचेचा रंग डार्क होतो. तसेच त्वचा रुक्ष दिसायला लागते. अनेक लोक या समस्यांपासून सुटका होण्यासाठी अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स वापरतात. अनेक वेळेस यांचे साईड इफेक्ट्स होतात. आम्ही तुम्हाला अशा काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करतात.
बेसन- बेसन त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. बेसन त्वचा उजळ बनवते. याचा उपयोग पॅक किंवा स्क्रब रूपात करू शकतात. याकरिता दुधात, दही, गुलाबजल, बेसन हे मिक्स करून लावावे.