Remedies For Split Ends Hair: दुभंगलेल्या केसांचा त्रास दूर करण्यासाठी हे अवलंबवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (22:41 IST)
सुंदर केसांसाठी मुली काहीही करतात, पण कधी कधी केस तुटून आणि कमकुवत होऊन खराब होतात. कधीकधी केसांच्या दुभंगल्यामुळे त्रास होतो. यामुळे केस पूर्णपणे निर्जीव होतात आणि त्यातील चमकही संपते. स्प्लिट एन्ड्समुळे केसांची वाढही थांबते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करा.
केस दुभंगल्याच मोठं कारण म्हणजे वारंवार केसांना धुणे.केस आठवड्यातून दोनदाच धुवावेत. केस वारंवार धुतल्याने त्यांच्यात कोरडेपणा येतो.
हीटिंग टूल्स वापरल्याने देखील स्प्लिट एंड्स होतात. कारण अति उष्णतेमुळे केसांची आर्द्रता संपते आणि ते निर्जीव होऊ लागतात. दीर्घकाळ केस सतत ट्रिम न केल्याने देखील केस दुभंगतात.म्हणून, ट्रिमिंग वेळोवेळी केले पाहिजे. दुभंगलेल्या केसांचा समस्येसाठी हे उपाय करा.
1 कोरफड जेल
केसांना एलोवेरा जेल लावल्याने केवळ स्प्लिट एंड्स नाही तर केसांच्या इतर समस्यांपासूनही सुटका मिळते. जर तुम्ही ताजे कोरफडीचे जेल लावले तर त्याचा परिणाम लवकर दिसून येईल. कोरफड वेरा जेल लावण्यासाठी फक्त पाने तोडून जेल एका डब्ब्यात ठेवा. नंतर ते केसांच्या मुळापासून खालच्या टोकापर्यंत लावा. साधारण अर्धा तास असेच राहू द्या. जेणेकरून कोरफडीचे जेल केस आणि मुळांमध्ये शोषले जाईल. त्यानंतर केस शॅम्पूने धुवा. एलोवेरा जेल सतत लावल्याने केसांमध्ये फरक दिसून येईल.
2 मध लावा-
मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय मधामुळे केसांनाही फायदा होतो. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत आणि चमकदार देखील होतात. यासोबतच कोरडेपणामुळे केस फुटण्याची समस्या दूर होते. केसांमध्ये मध लावण्यासाठी या गोष्टी मिसळा.
एक चमचा दही आणि अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये मध मिसळून पेस्ट बनवा. नंतर ही पेस्ट केसांपासून मुळांपर्यंत लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पेस्ट लावल्याने परिणाम दिसून येतो.
स्प्लिट एंड्सपासून मुक्त होण्यासाठी, केसांच्या काळजीच्या काही टिप्स नेहमी पाळणे आवश्यक आहे. शॅम्पू करण्यापूर्वी केसांना तेल लावा. यामुळे केस कमी कोरडे होतील आणि तुटणे कमी होईल.
तसेच, केसांसाठी अधिकाधिक नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या उत्पादनांचा वापर करा. यामुळे केस गळणे कमी होईल.