सकाळी सकाळी उठल्यावर आपण आपल्या चेहऱ्यावर सूज बघितली असेल. कधी कधी चेहऱ्यावर बारीक पुळ्या पण येतात. जास्त ताण, झोप पुरेशी न होणं किंवा एखाद्या वस्तूंची ऍलर्जी असल्यास बारीक पुळ्या किंवा पुरळ येतात. पण एक सोपी टिप्स अवलंबवून आपण त्वचेशी निगडित समस्यांपासून आराम मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत त्यात.
सकाळी- सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा. कोणतेही साबण, फेसवॉश न वापरता केवळ पाण्याने चेहरा धुवावा. तर आपल्या चेहऱ्यावर हळू-हळू तेज येऊ लागतो. असे आपण नियमित करावं. थोड्याच दिवसात आपणास फरक जाणवू लागेल. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.
* आपल्या सर्वांना हे ठाऊकच आहे की चेहऱ्यावर आईस क्यूब चोळणे फायदेशीर मानले जाते. त्याच प्रमाणे थंड पाण्याने चेहरा धुणं आपल्याला उत्साही करतं. असे केल्याने त्वचा घट्ट आणि टवटवीत राहते. आपली त्वचा तरुण राहते. आपण थंड पाण्याने चेहरा धुवत असाल, तर चेहऱ्याचा बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात.
* जर आपल्या त्वचेला सन बर्नचा त्रास होत असल्यास, दररोज सकाळी-सकाळी आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवावे. शक्य असल्यास दिवसातून एक ते दोन वेळा आवर्जून करावं. असे केल्यास आपल्याला सूर्य किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मुक्ती मिळेल आणि त्याच बरोबर आपल्या चेहऱ्यावर टवटवीत पणा येईल.