Lipstick Side Effects: दररोज लिपस्टिक लावणे आरोग्यासाठी घातक आहे
शनिवार, 25 मे 2024 (08:25 IST)
मुली किंवा महिला घरातून बाहेर जातांना त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्या ओठांवर नक्कीच लिपस्टिक लावतात. ते लावल्याने मेकअप तर पूर्ण होतोच पण लूक आणखी सुधारण्यास मदत होते. किंवा दुसऱ्या शब्दांत, लिपस्टिक लावून मेकअप ची पूर्णता होते असे म्हणू शकतो.
सर्व मुली जवळजवळ दररोज लिपस्टिक वापरतात. कारण त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढतो. पण तुम्हाला माहित आहे का की रोज लिपस्टिक लावणे तुमच्या ओठांसाठी हानिकारक ठरू शकते. याचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होतो आणि तुमच्या ओठांची नैसर्गिक चमक दूर होते.
लिपस्टिक मध्ये रसायने असतात जे ओठांसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील घातक आहे. अनेक वेळा महिला लिपस्टिक लावताना काही खातात किंवा पितात तेव्हा लिपस्टिकचा काही भाग आत जातो. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. याशिवाय लिपस्टिक रोज किंवा वारंवार लावल्याने तुमच्या ओठांना ॲलर्जी किंवा कोरडेपणा येऊ शकतो.
तज्ज्ञ सांगतात की लिपस्टिकमध्ये असलेल्या हानिकारक रसायनांमुळे तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. कारण ते लावल्याने काही घटक आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि अशा स्थितीत आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो.हे मेंदूसाठी हानिकारक आहे, त्वचेच्या समस्या होऊ शकतात, केन्सरचा धोका देखील वाढू शकतो.
कसे टाळायचे
लिपस्टिक लावण्यापूर्वी त्याची एक्स्पायरी डेट तपासा.
लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर बाम लावा. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसान टाळता येईल.
लिपस्टिक दररोज न लावता वेळेप्रसंगी लावा.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांवरील लिपस्टिक काढून झोपा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.