Lip Scrub: ओठांसाठी फायदेशीर लीप स्क्रब घरीच बनवा पद्धत जाणून घ्या

बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (18:26 IST)
ओठांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य टिकते. चेहरा छान असेल पण ओठ काळे असतील तर सौंदर्य बिघडते. ओठांना नैसर्गिक  गुलाबी करण्यासाठी घरीच बनलेला लीप स्क्रब वापरा. ओठांच्या त्वचेला एक्सफॉलिएट करण्यासाठी आणि त्यांना मऊ आणि गुलाबी करण्यासाठी स्क्रब करणे हा चांगला उपाय आहे.घरी बनवलेले स्क्रब मुलगा आणि मुली दोघेही वापरू शकतात. हे स्क्रब घरीच तयार करा पद्धत जाणून घ्या.
 
साहित्य -
1 चमचे मध
1 चमचे साखर 
कसे बनवायचे -
सर्वप्रथम एका लहान भांड्यात मध आणि साखर मिसळा काही वेळ तसेच राहू द्या. साखर विरघळू द्या.आता हे स्क्रब तयार आहे. 
कसे वापराल
स्क्रब ओठांवर हळुवारपणे लावा.हळुवार हाताने 1 ते 2 मिनिटे मसाज करा
नंतर ओल्या कपड्याने किंवा कोमट पाण्याने ओठांवरील स्क्रब स्वच्छ करा.  
नंतर ओठांवर खोबरेल ते किंवा लिपबाम लावा. हा स्क्रब आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरा आणि परिणाम बघा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती