त्वचेच्या ची काळजी घेण्यासह स्त्रिया आपल्या केसांची निगा देखील ठेवतात. केसांच्या वाढीसाठी आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात.महागडे उत्पादन वापरतात पण त्याचा विशेष प्रभाव पडत नाही. आज आम्ही केसांच्या वाढीसाठी लिंबाचे काही हेयर मास्क सांगत आहोत.ज्यांना वापरून केसांची चांगली वाढ होईल.चला तर मग जाणून घेऊ या.हे हेयर मास्क कसे बनवायचे.
1 नारळाचं पाणी आणि लिंबाच्या रसाचा हेयर मास्क-आपण बऱ्याच वेळा केसातील कोंडा घालविण्यासाठी नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून लावलाच असणार. केसांच्या वाढीसाठी नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून लावा.हे बनविण्यासाठी 1 कप नारळाचं पाणी,1 चमचा मध,आणि 3 चमचे लिंबाचा रस एकत्र करून केसांच्या मुळात लावून मॉलिश करा.1 तासानंतर केसांना शॅम्पूने धुवून घ्या.
2 चमचे ऑलिव्ह तेल,2 मोठे चमचे एरंडेल तेल आणि 3 मोठे चमचे लिंबाचा रस एकत्र करून कोमट करा आणि केसांच्या मुळात लावा. हे पॅक लावल्याने केसांची चांगली वाढ होते.1 तास हे पॅक लावून नंतर केसांना शॅम्पूने धुवून घ्या.
3 लिंबाचा रस आणि कोरफड जेल -कोरफड हे केसांसाठी कंडिशनरचे काम करतो. केसांचा कोंडा देखील कोरफडणे नाहीसा होतो.3 मोठे चमचे लिंबाचा रस,2 मोठे चमचे कोरफड जेल आणि 1 लहान चमचा मध एकत्र करून चांगल्या प्रकारे फेणून केसांच्या मुळात लावा .30 मिनिटा नंतर शॅम्पूने केसांना धुवून घ्या.