How to use conditioner केसांचे सेटिंग करण्यापूर्वी कंडिशनिंग करून घ्यावे. केस अधिक चांगले सेट करता येतात. कंडिशनर केवळ केसांना लावावा. शक्यतोवर टाळूला कंडिशनर लावू नये.
कंडिशनिंग करण्यापूर्वी केस व्यवस्थित धुऊन घ्यावेत, म्हणजे केसांवरील शॅम्पू पूर्णपणे निघून जाईल.
कंडिशनर वापरण्यापूर्वी केसांमधील जास्तीचे पाणी कमी करून घ्यावे व नंतर केसांना कंडिशनर चोळून लावावा. साधारणपणे पाच मिनिटांनंतर कंडिशनर पूर्णपणे धुऊन घ्यावा.
घरच्याघरी केसांना कंडिशनर करायचा असल्यास अंडे, मेंदी, मेथी किंवा जास्वंदाच्या पानांचा वापर करू शकता.
कंडिशनरच्या वापरामुळे केसांवर एक संरक्षक आवरण निर्माण होते. याच्यासाठी कंडिशनिंग करण्यापूर्वी चांगले शँपू वापरून केस स्वच्छ करून घ्यावेत आणि नंतरच कंडिशनिंग करावे.