आपल्या शरीरावर कोणत्याही प्रतिक्रियेमुळे बर्याचदा खाज सुटणे सुरु होते. खाज वेगवेगळ्या प्रकारे होते. एखाद्याला लवकर बरे वाटते तर एखाद्याला 24 तास खाज सुटते. घामोळ्या, पुरळ, एलर्जी असल्यास त्वचेवर पुरळ येत, त्वचा लालसर होते.
1 नारळाचं तेल- नारळाच्या तेलाची प्रकृती थंड असते, म्हणून खाज होत असल्यास सर्वप्रथम नारळाचं तेल लावा. त्वचा लाल होत असल्यास,घामोळ्या झाल्यावर नारळाचं तेल लावू शकता. उन्हाळ्यात कृत्रिम दागिने घातल्यावर मुरूम होतात, या साठी आपण नारळाचं तेल आणि पावडर लावावे.