‘फ्रेंच मॅनिक्‍युअर’करा घरच्या घरी

प्रसाधने – नेलफाईल, कोपऱ्यांसाठी पांढरे नेलपॉलिश, एक नेलपॉलिश उर्वरीत भागासाठी शक्‍यतो न्युड रंग असावा, ट्रान्सपरंट नेलकलर, नेल गाईड, नेलरिमुव्हर आणि एक लहानसा मेकअप ब्रश
 
असे करा
 
नखांच्या शेवटपर्यंत म्हणजेच नैसर्गिक पांढरा रंग असतो तिथेपर्यंत प्रत्येक बोटाला योग्य प्रकारे नेल फाईल लावा. ते घट्टपणे दाबा जेणेकरून नखांच्या उर्वरित ठिकाणी ते पसरणार नाही. आता यावर व्हाईट पॉलिश लावा. यानंतर ते कोरडे होऊ द्या.
 
नखांच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत रेषा मारण्यासाठी पांढऱ्या रंगांच्या नेलकलरचा वापर करा. नखाचे निमुळते टोक मात्र झाका. प्रत्येक नखाला याचे अनुसरण करा आणि ते कोरडे होऊ द्या. आता ब्रश नेलपॉलिश रिमुव्हरमध्ये बुडवा आणि ते गोलाकार पद्धतीने फिरवा. स्वच्छ सरळ रेषा सोडून नखाला लागलेले उर्वरित भागातील सर्व नेलपॉलिश काढून टाका.
 
उरलेल्या नखांच्या भागात न्युड कोट द्या, आता ते सुकू द्या. शेवटी संपूर्ण नखांना ट्रान्सपरंट कोट द्या. घरच्या घरी असे फ्रेंच मॅनिक्‍युअर करून सुंदर नखे मिळवा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती