उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या होतात.या ऋतूमध्ये बहुतेकांना मुरुम आणि ब्लॅकहेड्सचा त्रास होतो. चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स दिसू लागले तर ते सौंदर्य खराब करतात.या साठी लोक हजारो रुपये खर्च करतात.पण अनेकांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळच मिळत नाही.अशा परिस्थितीत घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता.ज्यामुळे जास्त पैसे खर्च न करता तुमचा चेहरा चमकू शकतो.
अंडी :
तुम्ही त्वचेच्या काळजीमध्ये अंड्यांचा वापर करू शकता.अंड्याच्या पांढऱ्यामध्ये आढळणारे घटक चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतात.यामुळे तुमची त्वचाही चमकदार होईल.हा मास्क बनवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग आणि की चमचा मद्य घ्या आणि चांगलं मिसळून घ्या. आणि काही वेळ चेहऱ्यावर लावून ठेवा काही वेळा नंतर धुवून घ्या. असं केल्याने ब्लॅकहेड्सपासून मुक्त होऊ शकता.
ग्रीन टी-
ग्रीन टी त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात,या मूळ ब्लॅकहेड्स दूर करण्यातही मदत करतात.हा मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम कोरड्या ग्रीनटीची पाने ते बारीक करून त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा.आता ही पेस्ट 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावा.आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरल्याने चांगले परिणाम दिसतील.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.