उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

मंगळवार, 11 मे 2021 (20:56 IST)
कोरोना काळात घरी राहिल्यावर देखील त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे की घरी राहिल्याने त्वचा चांगली होते परंतु असे काही नाही या साठी त्वचे ची योग्य काळजी घ्यावी लागते. चला तर मग जाणून घेऊ या की या कोरोनाच्या काळात त्वचेची काळजी कशी घ्यावी.
 
1 दही हरभराडाळीचे पीठ-त्वचा कोरडी झाली असेल तर दही आणि हरभराडाळीचे पीठ लावा.या मुळे त्वचा मऊ होईल. या साठी एका वाटीमध्ये 2 चमचे दही आणि एक चमचा हरभराडाळीचे पीठ मिसळून पेस्ट बनवून लावा 15 मिनिटा नंतर चेहरा धुवून घ्या. असं आठवड्यातून किमान दोनवेळा करा.
 
2  कोरफड आणि बोरोप्लस -पाण्याअभावी त्वचा खूप कोरडी होते. आपण पाणी प्यायले तरीही त्वचा सामान्य होण्यासाठी वेळ लागतो.
तोपर्यंत, दररोज झोपण्यापूर्वी कोरफड जेलमध्ये बोरोप्लस चांगल्या प्रकारे मिसळून चेहऱ्यावर लावून झोपून जा. सकाळी आपली त्वचा मऊ होईल. 
 
3 उटणे आणि ऑलिव्ह तेल -एका वाटीत 2 चमचे हरभराडाळीचे पीठ, 1 चमचा गव्हाचं पीठ,2 चिमूट हळद, अर्धा लिंबू, 2 केशराची पाने,थोडस दूध, 1 चमचा मलई,1 चमचा ऑलिव्ह तेल किंवा साधं तेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिसळा आणि पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा 5 मिनिटानंतर चोळून काढा. या मुळे आपला चेहरा उजळेल नंतर ऑलिव्ह तेलाने चेहऱ्याची आणि शरीराची मॉलिश करा.
 
4 पपई आणि मधाचे पॅक -  उन्हाळ्यात आपल्या त्वचेचा ताजेपणा कायम ठेवण्यासाठी पपई फेसपॅक लावा. एका वाडग्यात पपई मळून घ्या आणि त्यात 1 चमचे मध मिसळा. 30 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर  लावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
 
5. लिंबू मलई - होय, परंतु हे आपल्याला रात्रीच लावायचे आहे. या साठी  एका वाटीत 1 चमचे मलई आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि त्याला चेहऱ्यावर लावा आणि झोपून जा. 
सकाळी आपली त्वचा खूप मऊ होईल आणि कोरडेपणा देखील   वाटणार नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती