गुडघे आणि भुजांच्या पुढील भागावर शरीर टेकवा. उजवा पाय गुडघ्यापासून मोडा, पंजा वर करून प्वाइंट करत ठेवा. पाय जितका शक्य असेल तेवढा वर उचलून खाली आणा. पाठ अगदी सरळ असू द्या. तीस सेकंदापर्यंत ही क्रिया करा. पाय बदलून पुन्हा करा.
गुडघे मोडून पाठीवर लेटून जा. हिप्सच्या रुंदीप्रमाणे पायांमध्ये जागा ठेवा. हात दोन्ही बाजूला सरळ ठेवा हाताचे तळवे जमिनीवर. हिप्स संकुचित करून जमिनीपेक्षा जरा वरच्या बाजूला उचला. जमिनीवर डोके, खांदे आणि पायांचा जोर टाकून ही क्रिया करा. एक सेकंद अश्याच स्थिती राहा. हळू-हळू हिप्स पुन्हा जमिनीला टेकवा. ही क्रिया पाचदा करा.