2020 मध्ये शनीचा कोणत्या राशींवर पडणार प्रभाव

सोमवार, 23 डिसेंबर 2019 (11:47 IST)
शनी ग्रह म्हटल्यावर सर्वांना त्याबद्दल भीती वाटते. प्रत्येक राशीवर शनी आपली दृष्टी टाकतात. शनी प्रत्येक राशी मध्ये 2.5 वर्षे, 7.5 वर्षे असतात. त्या काळात जर शनीची आराधना केली की त्याचा त्रास कमी होतो. नवग्रहात शनी हे न्यायाचे दैवत आहे. कुंडलीत ज्या वेळेस ते अडीच वर्षे किव्हा साढेसात वर्ष शुभ असल्यास शुभ फलश्रुती देतात तसेच शनी अशुभ असल्यास त्या राशीस अशुभ फलश्रुती देतात.
 
शनी मंद चालणारा ग्रह असून एका राशीत किमान अडीच वर्ष राहतो. शनीला क्रूर ग्रह देखील म्हटलं जातं. शनी अशुभ असल्यास व्यक्तीस दुःख, त्रास, काळजी, अशांती, निराशा हाती लागते. तसेच शनी शुभ असल्यास शुभ फळ, सुख, शांती, समाधान प्राप्ती होते.
 
कुंडलीप्रमाणे शनीचा ज्या राशीत संक्रमण असतो. त्या राशी सोबतच त्याची पुढील राशी आणि बाराव्या राशीवर शनीच्या साढेसातीचा प्रभाव पडतो आणि ज्या राशीची चतुर्थ आणि आठवी राशी जी असते त्या राशीमध्ये शनी अडीच वर्षे राहतो. 
 
नवीन वर्षात शनी धनू राशीहून मकर राशीत प्रवेश करत असून याचा कोणत्या राशीवर काय प्रभाव पडणार जाणून घ्या. 
 
वर्ष 2020 मधील शनीच्या साढेसाती प्रभावी रास
 
धनू आणि मकर या राश्या शनीच्या साढे सातीने प्रभावित असणार.
 
मिथुन आणि तूळ ह्या राशींमध्ये शनी अडीच वर्षे असणार.
 
शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपाय-
 
१. दर शनिवारी सावली दान करा. (लोखंडी वाटी तेलाने भरून त्यात आपले मुखदर्शन करून ते दान करावे.)
 
२. दर शनिवारी 7 बदाम शनी देवास अर्पण करा.
 
३ दर शनिवारी भंडाऱ्यात कोळसा दान करा.
 
४  दर शनिवारी दिड किलो काळे हरभरे, सव्वा किलो उडिद, काळे मिरे, कोळसा, चामडे, आणि लोखंड हे काळ्या कपड्यात गुंडाळून दान करा.
 
५ दर शनिवारी मुंग्यांना साखर मिश्रित गव्हाचे पीठ घाला.
 
६ दर रोज पिंपळाला पाणी घाला.
 
७ दर रोज आंघोळीच्या पाण्यात बडी शेप, खस, काजळ आणि काळे तीळ टाकून अंघोळ करा.
 
८ दर रोज "ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनये नम:" या मंत्राचा जप करा.
 
९ दर रोज दशरथकृत शनीस्रोताचे पठण करा. 
 
१० ह्या अवधीत काळे आणि निळे वस्त्र धारण करू नका.
 
११ दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी काळे किंव्हा निळे कांबळे गरजूंना दान करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती