या राशीच्या लोकांसाठी सुरुवातीस थोडा संघर्षाचा काळ असेल. नंतरचा काळ उत्कृष्ट फळ देणारा आहे. सकारात्मक राहा, संयमाने पुढे वाढा. छोट्या छोट्या गोष्टी मुळे अस्वस्थ होऊ नका. करियर मध्ये हळू हळू प्रगती होईल. व्यवसायदारांना लाभ होईल. कोणावर ही विश्वास ठेवू नका. स्वतःच्या योजना दुसऱ्यास सांगू नका. पुढे त्रास संभवतो. कौटुंबिक सहल होऊ शकते. आपणांस कुटुंब सहकार्य करेल. कामाच्या ताणाचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. जोडीदाराशी संबंध उत्तम राहतील. प्रणयासाठी उत्तम वर्ष आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.