2016 वार्षिक टॅरो भविष्यफल

बुधवार, 6 जानेवारी 2016 (17:08 IST)
मेष: चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ
या वर्षी नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. हे वर्ष आपल्यासाठी सकारात्मक बदल आणेल. पदोन्नती मिळू शकते. गर्भवती महिलांनी स्व‍त:चे कडे दुर्लक्ष करू नये. धार्मिक कामात मन रमेल. परीक्षेत यश मिळेल. हे वर्ष आपल्या आणि आपल्या अपत्यांसाठी सुखकारी राहील. लोकं आपल्यावर विश्वास ठेवतील पण थोडीसी चूक आपल्याला महागात पडेल. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक ठेवणे गरजेचे आहे अन्यथा विश्वासघात होऊ शकतो. कोणत्याही कागदांवर सही करण्यापूर्वी तो लक्ष देऊन वाचावा. ऑगस्ट महिन्यात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
 
* दर शनिवारी शनी महाराजांवर तेल चढवा.
 
वृषभ: ई, उ, ए, ओ, वा, वी, बु, वे, वो
हे वर्ष आपल्यासाठी सुखद राहील. नवीन कार्यांमध्ये यश मिळेल. मां‍गलिक कार्य होईल. बॉस आपल्यावर प्रसन्न राहील. घरात भरभराटी येण्याने आर्थिक सुख लाभेल. अडकलेला पैसा मिळेल. समाजात सन्मान आणि भेट मिळण्याचे योग आहे. या वर्षी आपण ज्या कामात हात टाकाल त्या कामाला यश मिळेल. जुलैपर्यंत प्रॉपर्टी आणि वाहनसंबंधित कामात यश मिळेल. ऑगस्टपासून बदली होण्याचे योग आहे. हा बदल नोकरीतही होऊ शकतो. प्रवास करताना काळजी घ्या.
 
प्रत्येक शुक्रवारी कुत्र्याला पोळी द्या.
 
मिथुन: क, की, कू, घ, ड,छ, के, को, हा
वर्षाची सुरुवात काही विशेष कार्य पूर्ण करण्यात जाईल. वादापासून वाचा. समृद्धीसाठी पहिले सहा महिने अधिक अनुकूल राहतील. अपत्याला यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. परीक्षेत यश मिळेल. घरात मांगलिक कार्य होईल. ऑगस्टपासून सर्व बाजूने उत्तम समाचार प्राप्त होतील. सामाजिक कार्यांत रुची वाढेल. आय मनाप्रमाणे होईल. नवीन कामात धोका कमी होईल आणि अचानक धन लाभ होईल. अनओळखी लोकांची साथ मिळू शकते.
 
अपंग लोकांची सेवा करा.
कर्क: ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो
हे वर्ष नवीन ऊर्जा भरेल. नोकरीत असणार्‍यांची पदोन्नती होईल. राजनयिक हालचाल वाढेल. महान लोकांशी ओळख वाढेल. शत्रू परास्त होतील आणि आपण विजयी व्हाल. आय वाढेल. अपत्याकडून सुख समाचार मिळेल.
 
* प्रत्येक बुधवारी मासोळ्यांना दाणा टाका.
 
सिंह: मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
आरोग्यसंबंधित संकट येऊ शकतं. मित्र आणि नातेवाइकांशी वाद होऊ शकतो. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान नवीन अनुबंध प्राप्त होतील. विवाहासाठी वेळ अनुकूल आहे. अर्ध्या वर्षात खर्च वाढतील. आरोग्य, देणं-घेणं यात व्यय होईल. नातेवाइकांमध्ये भांडण होण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
 
दर शनिवारी शनी महाराजांवर तेल चढवा.
 
कन्या: टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
पहिले सहा महिने आर्थिक संकट राहील. स्वत:वर नियंत्रण ठेवून बौद्धिक कार्यामध्ये मन रमवा. जुलै या महिन्यात अचानक खर्च वाढतील. शेअर, सट्टा यापासून दूर राहा. एखाद अतिमूल्यावान वस्तू चोरी जाण्याची आशंका आहे. वायफळ खर्च टाळा. प्रवासासाठी हे वर्ष अनुकूल आहे. ऑगस्टनंतर वेळ अनुकूल आहे. मित्र आणि नातेवाइकांचा सहयोग मिळेल. 
 
हनुमानाची उपासना करा.

तूळ: रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते
हे वर्ष आपल्यासाठी शुभ राहील. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांशी संवाद वाढेल जे आपल्यासाठी लाभकारी ठरेल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. अडकलेला पैसा मिळेल. प्रत्येक कामात यश हाती लागेल. ऑगस्टपासून आरोग्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या वाकचातुर्यामुळे बॉस खूश राहील. पदोन्नती होण्याचे योग आहे.
 
* शनी चालीसाचा पाठ करा.
 
वृश्चिक: तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
हे वर्ष आपल्यासाठी वर्दळीतील राहतील. सहकार्‍यांचा साथ मिळेल. व्यवस्था संबंधी कामात बुद्धी चातुर्यामुळे यश मिळेल. सद्भाव आणि सद्गुणांमुळे अनेक मित्र बनतील. भावंडाशी आणि भेट आणि जवळीक वाढेल. यादरम्यान एखाद्या संताचा दर्शनाचा लाभ मिळेल. परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुलैपर्यंत इजा होण्याची भीती राहील. वाहन सावधपणे चालवा. तरुण पिढीला विशेष यश लाभेल.

* शनी चालीसाचा पाठ करा.
 
 
धनू: ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
मानसिक ताण दूर होईल. मनोरंजनाची संधी मिळेल. साहित्य सुख लाभेल ज्याने बौद्धिक संपदा वाढेल. अपत्याकडून सुख मिळेल. ऑगस्टमध्ये हळगरजीपणा नुकसान करेल. आरोग्य कमजोर राहील. अभिमान बाळगू नका याने हितचिंतक दूर होतील. स्वत:ला शांत आणि अनुकूल ठेवण्याचा प्रयत्न करा.
 
उपाय: शनी चालीसाचा पाठ करा.
मकर: भो, जा, जी, गा, गी, खा, खी, खे, खू
या वर्षी जुलैपर्यंत आपले ग्रह आपल्या जीवनात बदल घडवतील. नोकरीच्या क्षेत्रात परिवर्तन घडू शकतं. जुलैपर्यंत कोणता ही सौदा होण्याची शक्यता कमी आहे. वाहन खरेदीचे योग आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कामाचा ताप वाढेल म्हणून मानसिक संतुलन बनवून ठेवा. ऑगस्टपर्यंत आपण संकटांपासून बाहेर पडाल आणि मनासारखा लाभ मिळेल. देव दर्शनाचे योग आहे. सांसारिक सुखात वाढ होईल.
 
* महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
 
कुंभ: गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा
या वर्षी आपल्या जोडीदाराला किंवा अपत्याला त्रास होऊ शकतो. पोट दुखी आणि गुप्त काळजीमुळे चिंता वाढेल. कुटुंबात रूसवारूसवी राहील. मन उग्र आणि असंतुलित राहील. अधिक उग्रतेमुळे शारीरिक संघर्षही होऊ शकतो म्हणून क्रोधावर ताबा ठेवा. विवाह योग्य तरुणांचे विवाहाचे योग आहे. ऑगस्टपासून मानसिक स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्यात मित्र पूर्ण मदत करतील. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल.
 
* शनिवारी कुत्र्यांना दूध पाजा.
 
मीन: दी, दू, थ, झ, दे, दो, चा, ची
हे वर्ष आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले अडकलेले काम पूर्ण होतील. परीक्षेत यश मिळेल. अडकलेला रोजगार पुन्हा चालू होईल. मित्रांपासून मदत मिळेल. उदर विकार होऊ शकतो. बाहेर खाणे टाळा. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अभ्यासाकडे लक्ष देण्याची आहे. इतर कामांमध्ये मन रमवल्यास विपरित ‍परिणाम भोगावे लागतील.
 
* विष्णू सहस्रनामाचा जप करा.

वेबदुनिया वर वाचा