साप्ताहिक राशीफल 31 जुलै ते 6 ऑगस्ट

शनिवार, 30 जुलै 2016 (17:00 IST)
मेष : जीवनात प्रगती करण्यासाठी आपल्याला सहाय्याची गरज आहे. उच्च पदावर असलेल्या एखादा व्यक्क्तीसाबतच्या तुमच्या खाजगी ओळखीचा तुम्हाला लाभ होईल. धंदयात नवे दरवाजे तर उघडतील, पण या संधीसाठी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. वाहन वगैरे चालवताना जरा सावधानी बाळगा. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक प्रवास टाळावेत. घरातील वयस्कर व्यक्तींच्या प्रकृतीची चिंता जाणवेल. थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक विषयांवर आपल्या हातून लिखाण होईल. मित्रपरिवाराचे सहकार्यामुळे आपल्या रेंगाळलेल्या कामांना गती येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. शुभदिनांक 31, 3.
वृषभ : व्यापारधंद्यात काही बेत रद्द झाल्यामुळे किंवा लांबल्यामुळे गैरसोय. खर्चात वाढ. मार्चनंतर नवीन कामे मिळण्याची शक्यता. मे नंतर प्रगतीचा वेग वाढेल. काही कर्ज फेडू शकाला. ज्यादा भांडवल उपलब्ध होईल. यश मिळवण्यासाठी संघर्ष आवश्यक. प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. प्रसंगनिष्ठ राहून आपले काम साधून घेण्यात आपल्याला यश लाभणार आहे. उद्योग व्यापारात महत्वाचे काम करुन घेता येईल. नवीन ओळखींचा फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.व्यवसाय उद्योगात केलेले नवीन धाडस यशस्वी होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल. राजकीय क्षेत्रातील तरुण मंडळींना चांगल्या संधी, नवीन जबाबदार्‍या मिळतील. शुभदिनांक 3,4. 
मिथुन : नवीन जागा, वाहन खरेदी शक्य. पण नाकापेक्षा मोती जड होऊ देऊ नका. जून-जुलैनंतर मुलांचे उपद्‍व्यापल शिक्षणामुळे होणारे खर्च आणि वृद्ध व्यक्ती यासाठी खर्च. कलाकार-खेळाडू जनूपर्यंत चांगली कामगिरी करून नाव कमावतील. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. व्यवसाय-उद्योगातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. हातून पुण्यकर्म घडेल. आपली जिद्द व महत्त्वाकांक्षा यामुळे आपले ध्येय गाठणे सहज शक्य होईल. शुभदिनांक 5.
 
कर्क : वातावरण आपल्या तब्येतीसाठी ठीक नाही. पोटासंबंधीच्या विकारांपासून वाचण्यासाठी बाहेरचे खाणे टाळा. शेजाऱ्यांशी भांडण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. यासाठी आपले काम पूर्ण प्रामाणिकपणे करा. मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवनवीन कल्पना आकार घेतील. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. व्यवसाय उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रत्येक पाऊल सावधतेने उचलले. तर त्याचा आपल्याला त्रास होणार नाही आणि आशेचा नवीन किरण दिसेल.धार्मिक शुभसमारंभात सतत सहभाग घ्यायला मिळेल. तीर्थस्थळांना भेटी दिल्या जातील. दैनंदिन कामाच्या पद्घतीत केलेला थोडासा बदल सुखावह ठरेल.शुभदिनांक 1,4.
सिंह : सर्व प्रयत्नांतीही काम होईलसे दिसणार नाही, मेहनतीच्या तुलनेत फळ मिळणार नाही. जोडीदाराशी आपले वागणे ठीक राहणार नाही. आई-वडिलांच्या प्रसन्नतेची पूर्ण काळजी घ्या. अपत्यांकडूनही चांगली बातमी समजणार नाही. शत्रू हावी राहतील. मन अशांत राहील. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. नव्या ओळखी होतील व त्या फायदेशीर ठरतील. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. सप्तमातील चंद्रभ्रमणामुळे कामानिमित्त प्रवास घडून येतील. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल. जनसंपर्कातून आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. शुभदिनांक 4,5.
कन्या : मित्र तुम्हाला मदत करण्यासाठी कायम तत्पर राहतील. जोडीदाराचे हेकेखोर वागणे मानसिक तणाव वाढवेल. नोकरदार लोकांचे बॉसशी पटणार नाही. आरोग्यही साथ देणार नाही. एकुणातच हा आठवडा आपल्याला शुभ फ़ळ देणार नाही. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उत्तरार्धात खोट्या गोष्टी कळल्यामुळे रागाचा पारा उंचावेल. राशीतील मंगळामुळे धाडसी नेतृत्व केले जाईल. शुभदिनांक 2.
तूळ : धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रांसपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा. भागीदारी व्यवसायातून कामाचा व्याप वाढेल. उत्तरार्धात आपले मनोधैर्य एखादवेळेस खचण्याचा संभव राहतो. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. नवनवीन कल्पना आकार घेतील. व्यवसाय उद्योगात नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.शुभदिनांक 3,4.
वृश्चिक : अडलेली कामे होतील. खूप दिवसांपासून तुम्ही बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरवत आहात, तो पूर्ण होईल. कोणीतरी तुमच्यावर खोटा आरोप लावण्याची संधी शोधत आहे., सावधान राहा. अधिकारी लोकांशी चांगले संबंध राहतील, जे तुम्हाला दीर्घकालीन लाभ देतील. हाती घेतलेल्या कामाचा कंटाळा करुन चालणार नाही. व्यवसाय उद्योगात आपले काम सहायकांवर सोपविताना त्या कामात जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. लाभातील मंगळ आपल्या कर्तृत्वाला, मेहनतीला योग्य न्याय देतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. शुभदिनांक 5.
धनु : गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. व्यापारी वर्गासाठी अनुकूल वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. अनुकूल वेळ आहे. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना चांगल्या संधी लाभतील. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. राह्त्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. प्रवास सुखकर होईल. मनस्वास्थ लाभेल. शुभदिनांक 31.
 
मकर : कठीण वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला समजेल की कोण तुमचा किती मित्र आहे. मानसिक तणाव तर असेल, पण ईश्वर- नामस्मरणाने शांती मिळेल. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज रहावे लागेल. पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील. आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. उधारी उसनवारी वसूल होईल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. कुटुंबात आपल्या मतांचा आदर केला जाईल. मात्र महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे. भावाबहिणींशी बोलताना भावनिक उद्रेक होणार नाही याची दक्षता घ्या. जवळचे प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील आत्मविश्‍वास व कामाचा वेग वाढेल. शुभदिनांक 1, 2.
 
कुंभ : सोन्याच्या खरेदीने भविष्यात फायदा होईल. आपल्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मार्मिक वेळ आहे. लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. स्थावर मालमत्ता व्यवहारातून आर्थिक लाभ होतील. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल. आपल्याच राशीतून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील. धाडसी निर्णय घेतले जातील. साचेबद्ध जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. शुभदिनांक 5. 
मीन : प्रेम-प्रसंग विवाहापर्यंत पोहोचण्याचे योग आहेत. आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष दया, नाहीतर ते नाराज होऊ शकतात. पण व्यवस्थित समजवल्याने त्यांची नाराजी दूर होऊ शकते. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. या आठवड्यात पुढे घडणार्‍या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. महिलांनी जपजाप्याकडे जास्त लक्ष द्यावे. अंगी धडाडी येईल. एखादे नवे काम सुरु करण्याचा आज मानस असेल. मात्र त्यासाठी थोडाफार खर्चही करावा लागेल. महत्वाचे निर्णय शांत विचारपूर्वक घरातील मोठ्या व्यक्तिच्या सल्याने घेणे आवश्यक आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. शुभदिनांक 4,5. 

वेबदुनिया वर वाचा