साप्ताहिक राशीफल 10 ते 16 जुलै 2016

मेष : शासकीय कामात यशशासकीय कामात यश लाभेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. काहींच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात मानसिक परिवर्तनाची शक्यता आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. संततीसौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. बँकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभेल तसेच लेखक, प्रकाशक यांना चांगली संधी लाभणार आहे. व्यवसायात कमी-जास्त अडचणी जाणवणार आहे. वैवाहिक सौख्य सामान्य राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस शक्यतो टाळावे. प्रवासात दक्षता हवी. वाहने चालवतानाही अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. काहींचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कोणाच्याही सहकार्यावर व आश्वावसनावर अवलंबून राहू नका. 
 
वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीतशासकीय कामे पुढे ढकलावीत. थोरामोठय़ांकडून, वरिष्ठांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. आरोग्य चांगले राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. उधारी, उसनवारी वसूल होईल. कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभणार आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार शक्यतो पुढे ढकलावेत. महत्त्वाचे निर्णय या सप्ताहात नकोत. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल वाढेल. कामाचा ताण वाढेल, जबाबदारी वाढणार आहे. नवे स्नेहसंबंध जुळतील. मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. खर्च योग्य कामासाठी होतील. व्यवसाय वाढविण्यासाठी विशेष खटपट कराल. 
 
मिथून : वेगवान प्रगतीमिथुन व्यक्तींना सध्या ग्रहमान अनुकूल आहे. शासकीय कामात यश लाभेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. व्यवसायात समाधानाचे वातावरण राहणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नातेवाईक, मित्र, वरिष्ठ या सर्वांचे आपणाला भरपूर सहकार्य लाभणार आहे. प्रसिद्धी लाभेल. मानमान्यता लाभेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात ग्रहमान अत्यंत चांगले आहे. गुंतवणुकीला चांगले आहे. तुमच्या राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. ज्यांना बदली हवी आहे त्यांना निश्चिरतपणे बदलीसाठी योग्य ठिकाण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. वाटाघाटी, पत्र व्यवहार व फोन होतील. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. या सप्ताहात अनेक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवासाचे योग येतील. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडणार आहे.
कर्क : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थितीकर्क व्यक्तींना हा सप्ताह अत्यंत यशदायक व लाभदायक ठरणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक प्रगतीचे मान चांगले राहणार आहेत. उधारी, उसनवारी वसूल होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना बढतीची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना प्रतिष्ठा लाभेल. या सप्ताहात आपणाला अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वांचा, विचारांचा व कार्याचा प्रभाव पडेल. प्रॉपर्टीसाठी व गुंतवणुकीसाठी सप्ताह चांगला आहे. तुमच्या राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. वैवाहिक जीवनात, कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉण्ट्रॅक्टर्स यांना विशेष यश मिळेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. परदेश प्रवासाचे योग येतील. 
 
सिंह : थोरामोठय़ांचे सहकार्यआरोग्य चांगले राहणार आहे. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभणार आहे. शासकीय कामात यश लाभणार आहे. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांचे, उच्च पदस्थांचे, राजकीय व्यक्तींचे चांगले सहकार्य लाभणार आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक, बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभेल. तुमचा जनसंपर्क वाढेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. मात्र, प्रवासात दक्षता घेण्याची गरज आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार विलंबाने होणार आहे. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. व्यवसायात तुम्ही नवीन प्रयोग करू शकाल. नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. 
 
कन्या : आर्थिक सुयशआरोग्याच्या संदर्भात संमिश्र वातावरण राहणार आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत. आरोग्याकडे फार दुर्लक्ष करून चालणार नाही. थोरामोठय़ांकडून, वरिष्ठांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवणार आहेत. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. विरोधकावर मात कराल. मनोबल व आत्मविश्वा्स यांच्या जोरावर अडचणीवर मात कराल. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. प्रवासाचे योग येतील. तीर्थयात्रेचे योग येतील. गुरू बारावा आहे. त्यामुळे विवाह वगैरे शुभ कार्यासाठी गुरू अनुकूल नाही. प्रवासात वाहने चालवताना दक्षता घेण्याची गरज आहे. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. वैवाहिक जीवनात समाधानकारक स्थिती राहील. भागीदारी व्यवसायात चांगले वातावरण राहणार आहे.
तूळ : अनेकांचे सहकार्यया सप्ताहात आपणाला अनेकांचे सहकार्य मिळणार आहे. शासकीय कामात यश लाभणार आहे. थोरामोठय़ांचे, राजकीय व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना तसेच लेखन, प्रकाशन, मुद्रण, बँकिंग, विमा या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभणार आहे. मनोबल व आत्मविश्वाीस वाढेल. नवीन परिचय होतील. अपेक्षित पत्र व्यवहार व फोन होतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वाीस वाढेल. वैवाहिक जीवनात समाधानकारक वातावरण राहील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने वातावरण चांगले राहील. विशेषत: शासकीय कामाशी संबंधित व्यक्तींना विशेष आर्थिक लाभ होणार आहेत. 
 
वृश्चिक : व्यवसायात उत्तम स्थितीआरोग्याच्या संदर्भात लक्ष द्यावे लागेल. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश लाभेल. विशेषत: मेडिकल व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळणार आहे. शत्रूपिडा नाही. विरोधकावर मात कराल. संततीसौख्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य मिळणार आहे. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कला, संगीत,नाट्य या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मनोबल वाढणार आहे. कर्तृत्वाला संधी लाभणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडणार आहे.
 
धनू : दैनंदिन कामात यश लाभेलया सप्ताहात चंद्राची भ्रमणे आपणाला अनुकूल जाणार आहेत. उत्साह वाढेल, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. सामाजिक व सार्वजनिक कार्यात यश लाभणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. विद्यार्थ्यांना विशेष यश लाभेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना तसेच लेखन, प्रकाशन, बँकिंग, विमा या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. तुमच्या राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. नोकरीत बढतीची शक्यता आहे. बदली हवी असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. 
मकर : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थितीसप्ताहाचा उत्तरार्ध विशेष चांगला आहे. व्यवसायाची वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शासकीय कामात यश लाभेल. थोरामोठय़ांचे, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीला व गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉण्ट्रॅक्टर्स यांना सप्ताह चांगला आहे. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष संधी मिळणार आहे. नवे स्नेहसंबंध जुळतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. एखादी महत्त्वाची बातमी समजेल. शत्रुपिडा नाही. काहींना नातेवाईकांकरिता खर्च करावा लागेल. जबाबदारी वाढणार आहे. 
 
कुंभ : कामे मार्गी लागतीलआपणाला ग्रहमान चांगले आहे. विशेषत: आर्थिक क्षेत्रात आपणाला चांगले यश मिळणार आहे. शासकीय कामात यश लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे तर काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. नोकरीत पगारवाढीची शक्यता आहे. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉण्ट्रॅक्टर्स यांना विशेष यश लाभणार आहे. वाहनाच्या खरेदी-विक्रीतूनही लाभ होणार आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. प्रॉपर्टीची कामे विलंबाने होणार आहेत. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
 
मीन : शासकीय कामात यशशासकीय कामात यश लाभणार आहे. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. नोकरीत पगारवाढीची शक्यता आहे. बढतीची शक्यता आहे. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही. नवे स्नेहसंबंध जुळतील. काहींना तीर्थयात्रेचे तर काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. काहींची एखाद्या राजकीय मंडळावर नेमणूक होण्याची शक्यता आहे. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्तींना विशेष फायदा होणार आहे. तुमच्या राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. महत्त्वाची शासकीय कामे सध्याच्या अनुकूल ग्रहमानात उरकून घ्यावीत. विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा