वृश्चिक राशीच्या जातकांचे 2016 मधील संपूर्ण वार्षिक राशिभविष्यफल

बुधवार, 30 डिसेंबर 2015 (17:52 IST)
शनीसारखा कठोर ग्रह तुमच्या राशीत येऊन ठाण मांडून बसला आहे. या वर्षी मंगळही बराच काळ तुमच्या राशीतून भ्रमण करेल. या दोन्ही ग्रहांचे भ्रमण तुम्हाला फारसे चांगले नाही, पण भाग्यवर्धक गुरू तुम्हाला चांगली साथ देणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर असा पवित्रा तुम्ही ठेवलात तर तुम्ही अडचणीतून सहीसलामत बाहेर पडू शकाल. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळू देऊ नका. 

पुढे पहा ​गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... :  या वर्षामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तिंनी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराशी जुळवून घेण्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात सतत चढ-उतार येत राहतील. तुमच्या मुलांच्या वर्तनामुळे काहीवेळेस तुमच्यावर ताण येईल. आळसावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःला कार्यरत ठेवा ही सूचना. निरुत्साही वागणे आणि मौजमजेतच वेळ घालवणे यामुळे तुमच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमचे पैसे सुरक्षित ठेवा आणि ऑगस्टपर्यंत शक्य तितकी बचत करण्याचा प्रयत्न करा. 
 
प्रेम जीवनाबद्दल बोलायचं तर, शांत राहा आणि तुमच्या प्रेमामध्ये शंका आणि गैरसमज येऊ देऊ नका. ऑगस्टपर्यंत, तुमच्या प्रेम जीवनात खबरदार राहा. वैवाहिक आयुष्याद्वारे प्रत्येक प्रकारचं सुख मिळेल आणि तुम्ही शारीरिक सौख्याचा आनंद लुटाल. परंतु, त्यावर नियंत्रण ठेवणे हेच उत्तम. कौटुंबिक स्तरावरती काही मजेशीर अनुभव देणारे वर्ष पुढे आहे. एखादी सुखद घटना घडल्यामुळे तुमची निराशा कमी होईल.  

जानेवारी ते एप्रिल यादरम्यान एखाद्या प्रश्नाची किंवा धोक्याची तुम्हाला जाणीव होईल. त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच ठोस उपाय योजा. घरामध्ये एकत्र कुटुंबातून बाहेर पडण्याचे निर्णय होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै यादरम्यान ज्या घडामोडी घडतील त्यामुळे पूर्वी ठरलेले बेत बदलावे लागतील. जुलनंतर काही कठोर निर्णय घेऊन तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात आणावी लागेल. त्यामुळे तुमची दैनंदिनी आणि जीवनपद्धती बदलण्याची शक्यता आहे. सप्टेंबरनंतर सुटकेचा नि:श्वास टाकाल.
 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने वर्षांची सुरुवात चांगली हाईल. जानेवारीपर्यंत एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असा इरादा असेल तर तो सफल होईल.  फेब्रुवारी ते एप्रिल यादरम्यान एखादे मोठे प्रोजेक्ट हातात घ्यावेसे वाटेल. त्यासाठी वेळप्रसंगी मोठा धोका पत्करण्याचीही तुमची तयारी असेल. अशा वेळी हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. एप्रिल ते जुल यादरम्यान काही जुने प्रश्न अचानक डोक वर काढतील. जुल ते सप्टेंबर यादरम्यान तुमची सत्त्वपरीक्षा होणार आहे. महत्त्वाचे निर्णय अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार घ्या. सप्टेंबरनंतर परिस्थिती हळूहळू आटोक्यात येईल.
 
नोकदार व्यक्तींनी येत्या वर्षांत कोणताही वेडावाकडा निर्णय घेऊ नये. जानेवारीपर्यंत कामाचा वेग उत्तम राहील. जानेवारीनंतर एप्रिलपर्यंत निरभ्र आकाशात अचानक ढग आल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते तशी तुमची स्थिती असेल. नवीन ठिकाणी बदली, नव्या टेबलावर मिळणारे काम यामुळे तुमची दैनंदिनी बिनसण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुल यादरम्यान नोकरीच्या ठिकाणी सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवून वागा. तुमच्या हातून झालेली चूक वरिष्ठांना आवडणार नाही. जुलनंतर आपण कुठे चुकलो हे लक्षात येईल. 
 
ऑगस्ट-सप्टेंबरनंतर वातावरण हळूहळू शांत होत जाईल. तरुणांनी येत्या वर्षांत स्वप्नापेक्षा सत्य हे महत्त्वाचे असते हे लक्षात ठेवावे. नोकरी व्यवसायात अदबीने राहावे. विनाकारण बदल करू नये. कलाकार आणि खेळाडूंनी यश मिळविण्याकरिता त्यांचे कौशल्य वाढवावे आणि त्यांच्या तत्त्वांशी तडजोड करण्याची तयारी ठेवावी.

वेबदुनिया वर वाचा