मिथुन राशीच्या जातकांचे 2016चे संपूर्ण वार्षिक राशीभविष्यफल

मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (16:25 IST)
यावर्षाचा बराच कालावधी तुमच्या बाजूनं आहे असं दिसतं. नवीन वर्षांत गुरू तृतीयस्थानात भ्रमण करणार आहे. रवी, बुध, शुक्र आणि मंगळ या चार ग्रहांची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. आपल्या कामाला महत्त्व मिळून आपली आगळीवेगळी प्रतिमा निर्माण व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. जानेवारी २०१६ या दरम्यान काही तरी अधिक आणि चांगले करण्याचा तुमचा हेतू असेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान मोठय़ा व्यक्तींशी संपर्क होईल. येत्या वर्षांत स्पर्धकांचा विचार केल्याशिवाय कोणतेही नवीन बेत आखू नका, कारण स्पर्धा तीव्र होणार आहे.

पुढे वाचा गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान... : प्रेम आणि काळजी यामुळं तुम्ही आणि तुमचा जोडीदार निकट राहाल; परिणामी सर्वकाही एकोप्याचं राहील. दुसरीकडे तुमच्या जोडीदाराचे तुमच्या नातेवाईकांसोबतचे संबंध आंबट-गोड राहतील. प्रेमाच्या गोष्टी आश्वासक आहे, कारण प्रणयामुळे तुमचं जीवन सुखानं भरून जाईल. नेहमीच्या विषयांखेरीज, बाकी काही आपल्याला त्रासदायक संभवत नाही. तुमचं शरीर तुमचं मंदीर आहे; त्यामुळं, त्याबाबत आपण अतिशय गंभीर राहा. आपल्या दैनंदिनीत आरोग्यदायक आहार आणि व्यायाम अवश्य असू द्या.
 
कौटुंबिक स्तरावरती दोन वेगवेगळे अनुभव तुम्हाला येतील. डिसेंबर-जानेवारीपर्यंत एखादी चांगली घटना किंवा सोहळा घरामध्ये पार पडल्याने वेळ गडबडीत, पण छान जाईल. तरुण मंडळींना नवीन घराचे बुकिंग पूर्वी केलेले असेल तर त्याचा ताबा जूनच्या सुमारास मिळेल, पण काही कारणाने तेथे राहायला जाणे सप्टेंबपर्यंत लांबेल. जुल ते सप्टेंबर या दरम्यान घरामधील काही जुने वादविवाद डोके वर काढतील. 
 
आरोग्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्यावर वेळेवर उपाय करा. ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास तुम्हाला एकाकीपण जाणवेल. त्यानंतर विस्कटलेली घडी पुन्हा बसवता येईल. एकंदरीत वर्ष संमिश्र आहे. तरुण मंडळींना जूनपूर्वीचा कालावधी सर्वार्थाने प्रगतिकारक आहे. त्यांना गृहसौख्यात पदार्पण करावेसे वाटेल.
पुढे वाचा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : ज्योतिष्यानुसार, 2016 वर्ष व्यवसायिकांना लाभदायक ठरणार आहे. पैसे कमविण्यासाठी, ते बेकायदेशीर मार्गाची मदत घेण्याची शक्यता आहे. परंतु, हे टाळलं पाहिजे. व्यापारउद्योगात वर्षांची सलामी उत्साहवर्धक राहील. एप्रिल ते जुल या दरम्यान कामाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पन्नात भर पडेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर त्यामानाने शांत जाईल. येत्या वर्षांत प्राप्ती वाढेल, पण वेगवेगळ्या कारणांमुळे तुम्हाला पसे अपुरे पडतील.
 
नोकरदार व्यक्तींना नवीन वर्षांची सुरुवात आव्हानात्मक वाटेल. त्यांच्या आवडीचे काम मिळाल्यामुळे जानेवारीपर्यंत कष्टाचे प्रमाण वाढेल, परंतु कामात आनंद असेल. जानेवारी ते मार्च या दरम्यान एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. या दरम्यान परदेशी जाता येईल. एप्रिलनंतर संस्थेत घडणाऱ्या घडामोडींकडे नीट लक्ष ठेवा. तुमचे साथीदार तुमची संधी हिरावून घेण्यासाठी काही तरी प्रयत्न करतील. 
 
जुल ते सप्टेंबर या दरम्यान तुमचे गुप्त शत्रू तुमच्याविरुद्ध काही तरी कारवाया करतील. अशा वेळी मन शांत ठेवून एकचित्ताने तुमचे काम करा. त्यानंतर पुढील दिवाळीपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल. कलाकार आणि खेळाडूंना एप्रिल ते मेपर्यंतचा कालावधी चांगला आहे. 
 
त्यानंतर स्पर्धा तीव्र झाल्यामुळे एक प्रकारचा दबाव जाणवेल. तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा, कारण येणारा पैसा थोडा आखडू शकतो. प्रत्येक आर्थिक संकटापासून मुक्त राहण्यासाठी, कर्ज घेणे टाळा. कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांची येत्या वर्षात प्रगती झाली, तरी एक प्रकारचा दबाव राहील.  

वेबदुनिया वर वाचा