श्री परशुराम माहत्म्य अध्याय ४
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राय नमः ॥
जय जया **** कुल टिळका जय जया अद्भुत बालका जय जया लक्ष्मी नायका स्वयं ज्योती नमोस्तुते ॥१॥
ऐका तुह्मीं नाम कर्ण होतील तुमचे पवित्र कर्ण जे करिती नारायण चमत्कार लीलेचा ॥२॥
करुं म्हणे जमदग्नि नामकर्ण सहअग्नी उत्साह मांडला मग्नी निमंत्रण करीतसे ॥३॥
देव लोकीं ऋषी लोकीं मग बोलावणें नृलोकीं पै आणीक सर्व लोकीं बोलावणें केलें ॥४॥
सर्व लोकींच्या स्त्रियांसी रेणुका करी निमंत्रणासी उल्हासें पुत्रोत्साहासी वायनातें बहुकरी ॥५॥
लोक दर्शनाभिलाषी ब्रह्मादिक नानावेषी कश्यपादि सप्तऋषी सपत्नीक सर्व आले ॥६॥
हातीं घेवोनि वायनें चला चला बहुवचनें बोलती दाटी मार्गानें येती आश्रमा संनिध ॥७॥
टकटका पाहती शोभा ही काय हो आश्रमप्रभा असेल ही वैकुंठ सभा अश्चर्याद्भुत पाहती ॥८॥
वनें उपवनें कल्पतरु फलपुष्पें जाहला भारु दाडिंबें अंजीर पेरु कर्दली संमुख आल्या पैं ॥९॥
नानासरीं अमृतजळें शुभ्र पीत रक्तकमळें तेथें नाना हंस मेळे मकरंद सेविती ॥१०॥
जळ कुक्कुट खेळती पक्षी शुभशब्द करिती तटीं बैसोनि सूर्य ध्याती मुनिजन वैष्णव ॥११॥
तेव्हां लगबगा लोक येती ह्मणती चला आश्रमाप्रती नाम कर्ण संस्कार रीती पाहती सर्व येवोनी ॥१२॥
सपत्नीक जमदग्नी हवनादी पुण्याहवचनी महान ब्राह्मण सत्कारोनी आशिर्वाद घेतसे ॥१३॥
नक्षत्रमास कुलदेव नाम व्यवहार ठेविलें श्रीराम आशिर्वाद गायन साम ब्राह्मण संतर्पण करीतसे ॥१४॥
नाम चतुष्टय ठेउनी महावैष्णव ऋषीमुनी सर्व ह्मणती विश्वैकर मणी ह्मणोनी रामनाम ठेविलें ॥१५॥
ब्रह्मादि आश्चर्य ह्मणती नामातीतासी नाम ठेविती हा विष्णु सर्वनाम गती न जाणती मनुष्यादिक ॥१६॥
हा सर्व व्यापी मायातीत ज्याचे चरण मायासेवित ब्राह्मणांचें कुळदैवत लक्ष्मीनारायण बोलती ॥१७॥
तो हा अवतार धरुनी क्रीडा करी लीलेनी निर्लेप्य केवळ ज्ञानी जीवांतरीं व्याप्य जाणा ॥१८॥
तो हा क्षत्रियासी करील रणा दुष्ट पावतील मरणा गोब्राह्मण रक्षक जाणा एवं रामा नमोस्तुते ॥१९॥
ऐसें स्तवोनि ऋषी देव आपले भाग घोवोनि सर्व लोकीं गेले पुढें अपूर्व ऐका ऋषी सावध चित्तें ॥२०॥
त्द्या अपूर्व भगवत्कथा मृड वंदितो सर्वदा माथा येणेंचि प्रीती रमानाथा ती आदरें वर्णितों ॥२१॥
मग करिती अन्नप्राशन जो ईश्वर विश्व भक्षण दाढे धरिली पृथ्वी जाण त्याच्या जिव्हे शीत लाविती ॥२२॥
माता ह्मणे बाळा येई मधू अन्नमुखीं घेई मुख पसरी गा माझे आई बोले ऐसी लडिवाळे ॥२३॥
तेव्हां दावी मुखविस्तार पंचभूतें देववर सर्व लोक अब्धी भूधर मुखी अद्भुत देखिलें ॥२४॥
पाहूनि माता भयचकित काय बाळ काहे ह्मणत राक्षस माया किंवा भूत ह्मणूनि नृसींह बोलेती ॥२५॥
रेणुकेसी ह्मणे जमदग्नि भिऊ नको नारायण अग्नि करील सर्व भयभग्नि शांति सूक्त ह्मणेन ॥२६॥
मग तांबूल मुखीं घालोनी केला वाद्य घोष गायनीं आशिर्वाद शांती बोलोनी संपूर्ण करिती हवन ॥२७॥
आता तुह्मीं पुत्रवरा उद्योग परीक्षा करा शस्त्रलेखनी पुस्तक सरा पुढें टाकिली पुत्राचिया ॥२८॥
बाळा लवकरी घेई तें हास्य करुनी रांगेपाई चापत्यन अवरे आई काय करुं ह्मणतसे ॥२९॥
तेव्हां बाळक धांवोनी चपळपणें भिंती कोणीं धरिला फर्शु जावोनी हास्य दावी अपूर्व ॥३०॥
हां हां ह्मणती तेव्हां माय चापल्यानें करुं काय तुह्मीं न करावें हास्य बाय बाळ घ्यावें सत्वरतें ॥३१॥
काय आश्चर्य सर्व ह्मणती महाफर्शु काळगती बाळके धरिला हातीं पुढें काय करील ॥३२॥
मग ते ब्राह्मण मुनी कर्म समर्पिती सुमनीं ध्यानें जाणोनि प्रेमानी ह्मणती परशुराम तयासी ॥३३॥
स्त्रिया वायनातें देती हरिद्रा कुंकुम लाविती नाना उत्साह सूरी ती वाजती वाद्यें मंगल ॥३४॥
दुंदुभी मृदंग ताल सूर सनाई संबल वीणा वेणु शृंगवाद्य शंखादिक सुस्वरजाणा ॥३५॥
गोमुख घंटा चंद्र वाद्य सताल मुर जाझंका वाद्य वाजविती कर ताल आद्य नृत्यगायन करीती ॥३६॥
जमदग्निचे आश्रमा नाना देशीचे ब्राह्मण येऊनि करिती स्तवना विष्णु अवतार ह्मणोनी ॥३७॥
आर्या ॥ कैवारी भक्ताचे ॥ स्मरता हरती त्रिवीध दुःखातें ॥
चरणीं श्री सेवेच्या ॥ तल्लिनता हेचि प्रगट देखाते ॥३८॥
ओव्या ॥ जभटग्नि ह्मणे ब्राह्मणां तुह्मीं करावें भोजना आदरें भक्षण परमान्ना बरवें बरवें ह्मणती ॥३९॥
ब्राह्मण घेऊनि आमंत्रणासी **** सर्वते स्नानासी ऋषीनें प्रार्थिलें धेनूसी भोजनीं तृप्त करा ॥४०॥
एकतां वाक्य कामधेनू भूमीचा अंशती अन्नु इच्छिताचे केले गिरी पूर्णू तेव्हां तयारी भोजनाची ॥४१॥
अगणीत पात्रें मांडिलीं प्रत्येक पात्रीं द्रोणावली ॥ काढील्या विचित्र रंगवल्ली बैसाया पाट रुप्याचे ॥४२॥
वाढणें तेव्हां घेवोनी तीर्थी पुन्हा जावोनी चलावे लवकर सर्व मुनी प्रार्थना असे सकळिकां ॥४३॥
तेच आलोंच ह्मणती ब्राह्मन करोनि नाममुद्रा जाण संध्यापूजा अनुष्ठान आले करोनी लवकर ॥४४॥
हो हो ह्मणती तयारी आचार्य भट्ट द्विजवरी दूर्वासादिअन्नारी येवोनि बैसले ॥४५॥
देवांसी उपजली आशा तेही सर्व ब्राह्मणवेषा अमृताची सोडोनि दिशा आले प्रसाद भक्षावया ॥४६॥
अमीत आले ज्ञानी ब्राह्मण भोळे नामधारक जाण ध्याननिष्ठ नियमीं भक्तिमान वेदपाठक चतुर्वेदी ॥४७॥
ह्मणती अह्मीं आपस्तंब एक ह्मणती हे मुखस्तंब एक ह्मणती भोजनीं अगडबंब अमिताशी आहोत ॥४८॥
ह्मणती काय हो विचित्र शाल्येने दश आहेत पायसांने शतकोशि **** सुमनें सांडगे पर्पट परीचे ॥४९॥
फल पल्लवाच्या शाका शातवधी बहुनामिका दहा आहेत मिष्ट कथिका डाळीच्या उसळी आणीक पैं ॥५०॥
लड्डु करंजि का मांडे कुंकुमा परी पहावडे घीवर अपूप काय दिंडे पुर्या असती अपूर्वचि ॥५१॥
पाटवडया खांडवीं सांदन कडबू मोदक समोहन भजीं पारिका सुमौन पोळिका दिव्य पैं ॥५२॥
जिलब्या श्रीखंड सुधारस मेवान्न शिक्रण आंबरस पंचामृत पयादि ॥५३॥
वरी वाढिलें वरान्न तेव्हां अमीत घृत गहन वाढितां कृष्णार्पण ह्मणून भोजना बैसले ॥५४॥
ह्मणाह्मणती गोविंद ॥ ग्रासोग्रासी कीर्तनानंद जो न करीतोचि मंद पाप कंद सर्वदा ॥५५॥
जो गोविंद नामें जेविला तो निराहारी बोलिला जन्ममृत्यु पासोनि सुटला जिवन्मुक्त तोचि पै ॥५६॥
आब्रह्म स्तंभ पर्यंत जगत जालें सर्वतृप्त अन्नब्रह्म ह्मणती सतत अनुपम त्यांतून हे ॥५७॥
जेथें प्रत्यक्ष कामधेनू तेथील अन्ने कितीं वर्णूं तया गोडीचें अनुमानू नकळे कोणासी ॥५८॥
ईश माहात्में पूर्णआन्न वर्णना न पुरती जन्म वेदवेद्य एक राम अह्मीं तया नमीतों ॥५९॥
त्द्या अध्यायामृतातें वाचितां होय सुखातें त्यासी मिळेल अन्नातें भक्तिवांछा होईल ॥६०॥
हें परशुरामचरित्र केलें अमृताचें सत्र तृप्त व्हा श्रोते पवित्र सावधान परिसीजे ॥६१॥
स्वस्त्रीश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु चतुर्थोध्याय गोड हा ॥४॥श्रीभ्रुकुळटिळकार्पणमस्तु ॥