जय जय नवनाथांचा । जय ज्ञानेशांचा । योगीजन नीरांजन । जय गर्जू गुरुंचा ॥
जय देवा जय देवा । जय जय नवनाथा । जय श्रीसांब सदाशिव । जय आज्ञा नाथा ॥ जय जय ॥१॥
जय श्रीदत्तानाथा । जय श्री रघुनाथा । जय नाथा मछिंद्रा । गुरु होसी इंद्रा ॥ जय जय ॥२॥
गोरक्षा तूं रक्षिसि । मोहातुनि गुरुसि । शिष्योत्तम तू होसी । जय तव श्रीनाथा ॥३॥
मागू नाथापाशी । मुक्ति आम्हां द्यावी । जय नाथा, नवनाथा । आरती पुरवावी ॥५॥
जय जय नवनाथांचा । जय ज्ञानेशांचा । योगीजन निरांजन । जय गर्जू गुरुंचा ॥ जयदेवा ॥