दत्त आरती.. जय देव जय देव दत्ता अवधूता

बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (15:38 IST)
जय देव जय देव दत्ता अवधूता ॥ 
आरति ओवाळूं तुज सद‌गुरुनाथा ॥जय.॥
 
स्वच्छंदें व्यवहारी आनंद भरिता ॥ 
कायामाया अनसूयासुता ॥जय.॥१॥
 
रजतमसत्त्वाविरहित दत्तात्रय नामा ॥ 
नामाकामातीता चैतन्यधामा ॥जय.॥२॥
 
नामावेषधारी सर्वांतर्यामीं ॥ 
अनन्यभावें शरण दिन माणिक नामीं ॥जय.॥३॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती