येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही महत्त्वाची सुनावणी होत आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ही सुनावणी होणार आहे. मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने यासाठी 4 वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला होता. त्यानंतर ही सुनावणी होत आहे.